पुणे : गेल्या 10-12 दिवसांपासून राज्यात मुंबईसह कोकण, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरू होता. मध्यंतरी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक धरणांमध्ये अचानक पाणी पातळी वाढली होती आणि यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता मुंबईसह राज्यातील पावसाचा जोर सर्वसामान्य जनजीवनही पूर्वपदावर आले आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात उद्या पावसाची काय परिस्थिती असेल, हे जाणून घेऊयात.
advertisement
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैपासून ते 2 ऑगस्टपर्यंत उत्तर कोकणातील पालघर, ठाणे तसेच मुंबईमध्ये या काळात ग्रीन अलर्ट राहणार आहे. म्हणजे येथे अगदीच हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. पुढील 2 दिवस मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहिलं तर पालघर आणि उपनगर या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबईत उद्या कमाल 31°C तर किमान 22°C तापमान असेल.
पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर येत्या 4 दिवस यलो अलर्ट राहणार आहे. म्हणजे या संबंधीत जिल्ह्यातील काही भागांमध्ये या काळात चांगला पाऊस पडणार आहे. पुण्यात दिवसभर पाऊसाची रिपरिप सुरूच राहिलं. तर कोल्हापूरमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात उद्या 30°C कमाल तर 20°C किमान तापमान असेल. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात 32°C कमाल तर 25°C किमान तापमान असेल.
मराठवाड्यातही आगामी काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर छ. संभाजीनगरमध्ये कमाल 35°C तर किमान 23°C किमान तापमानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आगरी कोळी समाजातील पाण्यावरची भाकरी कशी तयार करतात, तुम्हालाही शिकाचयं असेल अशी आहे रेसिपी, VIDEO
विदर्भातही 1-2 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. तर अमरावती जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. तर नागपूर, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात उद्या कमाल 33°C तर किमान 24°C तापमान असेल.
राज्यातील काही भागात गेल्या 15 दिवसात अति-मुसळधार पाऊस झाला. मात्र, आता पुढील 3-4 दिवस राज्यात पावसाचा जोर कमी असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.