अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, 01427 खडकी–हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक विशेष गाडी, जी पूर्वी 26 ऑक्टोबर पर्यंत चालणार होती, ती आता 29 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर रोजी धावणार आहे. या गाडीच्या दोन अतिरिक्त फेऱ्या जोडण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे, 01428 हजरत निजामुद्दीन–खडकी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी, जी आधी 27 ऑक्टोबर पर्यंत चालणार होती, तीही वाढवण्यात आली आहे. ही गाडी आता 30 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर रोजी धावेल. या गाडीच्या देखील दोन अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
advertisement
मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट, सोलापुरातून धावणार जालना – तिरुचानूर विशेष रेल्वे, वेळापत्रक आणि थांबे
ट्रेन क्रमांक 01427 खडकी–हजरत निजामुद्दीन विशेष गाडीच्या अतिरिक्त फेऱ्यांसाठी आरक्षण प्रक्रिया 18 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. प्रवासी या गाडीचे तिकीट सर्व PRS केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करता येतील.
पुणे आणि दिल्ली दरम्यान सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढलेल्या प्रवासाच्या मागणीचा विचार करून या विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.