दिवाळीत पुणे-दिल्ली प्रवास सोपा! मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, खडकीहून जादा गाड्या, पाहा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Diwali Special Train: मध्य रेल्वेकडून खडकी–हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आला आहे.
पुणे : दिवाळी आणि छठ पूजा या सणांना अनेकजण आपल्या गावी जातात. त्यामुळे या काळात रेल्वे स्थानकांवर आणि बसस्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज दिली आहे. खडकी–हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, 01427 खडकी–हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक विशेष गाडी, जी पूर्वी 26 ऑक्टोबर पर्यंत चालणार होती, ती आता 29 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर रोजी धावणार आहे. या गाडीच्या दोन अतिरिक्त फेऱ्या जोडण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे, 01428 हजरत निजामुद्दीन–खडकी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी, जी आधी 27 ऑक्टोबर पर्यंत चालणार होती, तीही वाढवण्यात आली आहे. ही गाडी आता 30 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर रोजी धावेल. या गाडीच्या देखील दोन अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
advertisement
ट्रेन क्रमांक 01427 खडकी–हजरत निजामुद्दीन विशेष गाडीच्या अतिरिक्त फेऱ्यांसाठी आरक्षण प्रक्रिया 18 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. प्रवासी या गाडीचे तिकीट सर्व PRS केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करता येतील.
पुणे आणि दिल्ली दरम्यान सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढलेल्या प्रवासाच्या मागणीचा विचार करून या विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 18, 2025 9:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
दिवाळीत पुणे-दिल्ली प्रवास सोपा! मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, खडकीहून जादा गाड्या, पाहा वेळापत्रक