पुणे: एखादी घटना आपल्या आयुष्यात घडून गेली की तो प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जातो. असंच काहीसं पुण्यातील मंचर तालुक्यातील आयुष घोलप यांच्यासोबत घडलंय. आयुषचे वडील समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांचा अपघात झाला. त्यावेळी आयुषने झोपेत डोळा लागल्यामुळे वडिलांचा अपघात झाला हे हेरले आणि त्यातूनच त्याने घरातील काही वस्तू वापरून सेन्सर गॉगल बनवला. यामुळे अपघात टाळण्यासाठी मदत होणार आहे.
advertisement
पुण्यातील मंचर तालुक्यातील अवसरी या गावातील न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल शाळेच्या इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या आयुषने अपघात टाळण्यासाठी सेन्सर गॉगल बनवला आहे. महामार्ग आणि इतर रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. अपघातांच्या विविध कारणांमध्ये चालकाला डुलकी लागून महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी मी गॉगल बनवला असल्याचं आयुषने म्हटलंय.
आता अपघातात वाचणार प्राण, मराठी तरुणानं बनवली 'अलर्ट सिस्टिम', कसं चालतं काम? Video
कसा तयार केला गॉगल?
हा गॉगल तयार करण्यासाठी सेन्सर, बटन, बजर, गॉगल, बॅटरी, चार्जर हे साहित्य वापरले असून यासाठी फक्त अडीचशे रुपये खर्च आला आहे. भविष्यात या गॉगलवर तज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून गॉगल विकसित करून वापरात आला तर हजारो वाहन चालकांचे आणि प्रवाशांचे प्राण वाचणार आहेत.
Road Safety अपघातानंतरचा 'गोल्डन अवर' म्हणजे काय? या काळात नेमकी काय काळजी घ्यावी? Video
आठवीमध्ये शिकत असलेल्या आयुषला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड असून तो घरातील बिघडलेल्या वस्तू स्वतः दुरुस्त करतो. त्याला या वस्तू दुरुस्त करायला आवडतात, असं आयुषची आई रेशमा घोलप यांनी सांगितलं.
20 वर्षांपूर्वी झाला होता अपघात; गुप्ता यांनी घेतला धडा, आता करतायेत जनजागृती, Video
आयुषने तयार केलेल्या या सेन्सर गॉगलची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील घेतली आहे. गडकरी यांनी सेन्सर गॉगल समजून घेऊन यामध्ये काही सूचना केल्या असल्याचं ऑक्सफर्ड स्कुलच्या संचालिका स्वाती मुळे यांनी सांगितलं.





