समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सूरज मराठे आहे. ते सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहे. आजरपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. डेक्कनच्या लॉजमध्ये जाऊन पोलिस अधिकाऱ्याने मृत्यूला कवटाळलं आहे. महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 25 व्या वर्षी पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.
advertisement
आजारपणामुळे कंटाळले आणि उचललं टोकाचं पाऊल
सूरज मराठे यांचे कुटुंब देहू येथे वास्तव्यास आहे. ते सध्या सांगली पोलीस दलात कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गुडघ्यांच्या वेदनांमुळे ते त्रस्त होते. गुडघ्यांच्या दुखण्यामुळे ते उपचारासाठी ते पुण्याला येत होते. गुडघ्यांवरील उपचारासाठी त्यांनी रजा घेतली होती. पुण्यात आल्यानंतर ते उपचारासाठी डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये थांबले होते. उपचार केल्यानंतर ते रुमवर आले आणि त्यांनी विष प्राशन करत आयुष्य संपवले.
पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली
घटनेच्या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली असून, त्यामध्ये आजारपणाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र चिठ्ठीतील मजकूराबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
