पुणे : आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांची आणि अजित पवरांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.यावरून अनेक मतभेद झाले. अखेर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या संदर्भातील परिपत्रक काढले असून महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र युती आणि आघाड्यांच्या चर्चांना वेग आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मतभेद पाहायला मिळाले. प्रशांत जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेला पक्षातूनच विरोध होता. पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील एक गट अजित पवारांसोबत युतीसाठी आग्रही होता. त्यानंतर पक्षात पडलेल्या या मतभेदाच्या फुटीवर शरद पवार अंतीम निर्णय घेतील.
advertisement
काय लिहिलं आहे परिपत्रकात?
अखेर आज परिपत्रकाद्वारे निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक शहर व जिल्ह्यातील कार्यकारिणीने निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी मित्र पक्षांसोबत चर्चा सुरू करावी असे आदेश प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता तसेच, युती किंवा आघाडी यांसह निवडणुकीबद्दल इतर माहिती देण्याचे अधिकार फक्त जिल्हाध्यक्षांना व शहराध्यक्षांना देण्यात आले, असे देखील परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट संकेत दिसतं आहेत. पक्षाचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षात एका गटाने थेट अजित पवार गटासोबत युती करावी, यासाठी जोरदार आग्रह धरला आहे. पुण्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा आहे की, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेला पक्षातूनच विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री पक्षाची बैठक झाली असून बैठकीत ठराव करण्यात आला आहे की,पुणे शहराचा निर्णय हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे व शशिकांत शिंदे यांना आहे . पवार साहेब जो काही अंतिम आदेश देतील तो अंतिम असेल , असे जाहीर करण्यात आले होते. अखेर आज या संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
