TRENDING:

Pune News : गणवेश आणि ओळखपत्र नसेल तर घरी निघा! PMPL कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेले नवीन नियम कोणते?

Last Updated:

पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या पीएमपीएमएल प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कामावर असताना सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे आणि ओळखपत्र गळ्यात लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या पीएमपीएमएल प्रशासनाने अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर नविन नियम लागू केले आहेत. आता कामावर असताना सर्व अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे आणि ओळखपत्र गळ्यात लावणे अनिवार्य केले आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास प्रत्येकीवर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल. या निर्णयाबाबत पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देरे यांनी स्पष्ट आदेश जारी केले आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास पी एम पी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसणार भुर्दंड
नियमांचे उल्लंघन केल्यास पी एम पी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसणार भुर्दंड
advertisement

दररोज पीएमपीएमएलच्या बससेवेत तब्बल दहा लाख प्रवासी प्रवास करतात. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ही सेवा पोहोचली आहे. शेकडो मार्गांवर हजारो बसेस धावत असताना हजारो अधिकारी आणि कर्मचारी व्यवस्थापनाचे काम पाहतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यरत कर्मचाऱ्यांमुळे ओळख स्पष्ट ठेवणे आणि शिस्तबद्धता राखणे महत्त्वाचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

विशेष म्हणजे, जे कर्मचाऱ्यांना गणवेश नेमून दिला गेला आहे, त्यांनी तो परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच ओळखपत्र नेहमी गळ्यात लावणे अनिवार्य आहे. तपासणीदरम्यान नियमभंग आढळल्यास संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी दंडात्मक कारवाईला सामोरे जाईल. यासाठी सर्व विभागप्रमुख, आगार व्यवस्थापक आणि डिपो मेंटेनन्स इंजिनिअर यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

हा निर्णय केवळ शिस्त आणि व्यावसायिकता राखण्यासाठी नाही तर प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. गणवेश आणि ओळखपत्रामुळे कर्मचाऱ्यांची ओळख स्पष्ट होते, कोणतीही गैरसमज टाळली जातात आणि व्यवस्थापन प्रभावीपणे चालू राहते. अशा प्रकारे, पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कर्मचारी कार्यक्षमतेसाठी या नियमांची अंमलबजावणी करत कार्यवाही सुरू केली आहे. एकंदरीत, पीएमपीएमएल प्रशासनाचा हा निर्णय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत शिस्त, सुरक्षितता आणि व्यावसायिकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा पाऊल आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : गणवेश आणि ओळखपत्र नसेल तर घरी निघा! PMPL कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेले नवीन नियम कोणते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल