पोलीस प्रशासनाकडून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून मनाई करण्यात आली आहे. तशी नोटीस बजावली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईला निघणारच, असं ठामपणे सांगितलं.
'आता एक मोठं शिष्टमंडळ येणार आहे, असं म्हटलं आहे. मंत्री आणि सचिव येतील. तुम्ही सांगा आले तर हॉटेल आणि घरात बसून चर्चा करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हीसीवर चर्चा करणार होतो. पण इथं रेंज नाही. त्यामुळे चर्चा करणार नाही असं सांगितलं आहे. साहेबांशी किती बोलावं. आता माझी जाहीर विनंती आहे, आम्ही काही मजा करायला आलो नाही. इथं माझ्या मराठा बांधव थंडी वाऱ्यात बसले आहे. आमचंही सोप्पं नाही. आमचेही हाल होत आहे. मुख्यमंत्री साहेब, फडणवीस आणि अजितदादांनी एकत्र येऊन चर्चा करावी. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही. त्यांनी यावं आणि लगेच तोडगा काढावा' अशी विनंतीही मनोज जरांगेंनी केली.
advertisement
'हे असंच चालू राहणार आहे, शिष्टमंडळ येणार चर्चा सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही तिघांनी एकत्र यावं आणि चर्चा करावी, अशी आमची विनंती आहे' असंही जरांगे म्हणाले.