1) केस व नखं कापणं टाळा
बुद्ध पूर्णिमेच्या दिवशी केस किंवा नखं कापू नयेत, असे शास्त्रांमध्ये म्हटले आहे. विशेषतः महिलांनी या दिवशी केस धुणंही टाळावं. असे केल्यास कुंडलीतील बृहस्पति ग्रह कुपित होतो, ज्यामुळे नकारात्मकता वाढते आणि जीवनात दुर्दैवाचा प्रवेश होतो.हे शारीरिक सौंदर्याच्या पलीकडे जाऊन अध्यात्मिक दोष निर्माण करू शकते.
2) मांसाहार,नशेपासून दूर रहा
advertisement
या पवित्र दिवशी मांसाहार,मद्यपान किंवा इतर कोणतेही नशेचे सेवन करू नये. शुद्ध सात्विक अन्नच ग्रहण केल्यास पुण्य फळ वाढते. अशा तामसिक वस्तू खाल्ल्यास शरीर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे भविष्यकाळात आरोग्य व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
3) गडद रंगांचे कपडे टाळा
बुद्ध पूर्णिमेच्या दिवशी काळा, निळा आणि इतर गडद रंगांचे कपडे घालणे टाळा. गडद रंग नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात आणि त्यामुळे घरात मानसिक अशांतता, तणाव आणि वादविवाद होऊ शकतात. याऐवजी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शांतता आणि सकारात्मकता वाढवते.
4) उशिरा झोपून उठू नका
या दिवशी अति झोप किंवा उशिरा उठणं टाळावं, असे शास्त्र सांगते. पौर्णिमेच्या सकाळी लवकर उठून स्नान, ध्यान आणि दान केल्याने अधिक पुण्य मिळते. उशिरा उठल्यास आळस वाढतो, आणि जीवनात सकारात्मक संधी दूर जातात. ईश्वरी कृपा लाभण्यासाठी सकाळी स्नान करून पूजा करणे अनिवार्य आहे.
5) पवित्र वृक्षांची तोडणी नको
बुद्ध पूर्णिमेच्या दिवशी तुलसी, पीपळ, बेलपत्र यांचे पानं तोडू नयेत. यामुळे पतीच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो, अशी धारणा आहे. हे वृक्ष पवित्र मानले गेले असून त्यांची छाया, फळं व पानं पूजेसाठी उपयोगात आणली जातात. त्यामुळे त्यांच्या तोडणीने पुण्य कमी आणि पाप वाढते, असे मानले जाते.
6) वाद-विवाद, राग टाळा
या दिवशी घरात राग, वादविवाद किंवा अपशब्द टाळणं गरजेचं आहे. यामुळे घरात नकारात्मक लहरी उत्पन्न होतात, ज्या लक्ष्मीमातेच्या कृपेला अडथळा आणू शकतात. या दिवशी शांतचित्ताने वागणं आणि दानधर्म, जप-तप, ध्यान याकडे कल असणं उत्तम ठरतं.
(महत्वाची सूचना - ही बातमी फक्त माहिती करीता आहे. याची न्यूज 18 मराठी पुष्टी करत नाही.)