हा आहे पवमानाचा अर्थ ?
'पवमान हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. पवमान म्हणजे अग्नी, वारा अशा अर्थानी वेदांमध्ये त्याचे संदर्भ आढळतात. पवमानचा मुख्य अर्थ अंतर्बाह्य शुद्ध झालेला , परमतत्व जाणण्यासाठी केलेला अभिषेक म्हणजे पवमान अभिषेक असा आहे,' असं फडके यांनी सांगितलं.
संकष्टीला चंद्रदर्शनानंतर उपवास का सोडतात? ‘हे’ आहे कारण
advertisement
सोमरसाशी काय संबंध?
सोमरस म्हणजे सोमवल्ली या वृक्षापासून तयार केला जाणारा एक रस. पवमानमध्ये सोम वल्लीची स्तुती केल्याचे आढळून येते. हा रस प्राशन करून इंद्र आणि अनेक देवतांनी परक्रम गाजवल्याचा उल्लेख अनेक स्तोत्रात केला आहे. हा रस दोन लाकडी उपकरणाने कुटून तयार केला जातो.
सोमवल्लीचे वर्णन अध्यात्मात किंवा वेदात केले आहे. असे असले तरी हा वृक्ष अद्यापही सापडलेला नाही. ही वल्ली हिमालयात सापडते, असे सांगितले जात असले तरी आतापर्यंत कोणतीही वल्ली सापडलेली नाही नाही अशी माहिती फडके यांनी दिली.
वेदांतात या वृक्षाचे वर्णन करण्यात आले असून ही वल्ली करड्या रंगाची असते. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत या वल्लीचे एक एक पान उगवते असे सांगितले जाते. ऋग्वेदातील पहिल्या व दहाव्या मंडलातील दोन सूक्त पवमानात असून त्यात या सोमवल्लीचा उल्लेख आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
येत्या नागपंचमीला करा हे 5 सोपे उपाय, कालसर्प दोषातून मिळेल मुक्ती
पवमान अभिषेक विष्णूसाठीच का?
पवमान अभिषेकात सोमवल्लीचा उल्लेख आहे. ही सोम वल्ली विष्णूचे प्रतीक आहे. तिची देवता भगवान विष्णू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ती विष्णूला प्रिय असून पवमानचा अभिषेक विष्णू आणि हनुमंतावर केला जातो, असे त्यांनी सांगितले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)