देवघर : सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला आणि सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा झाला. हा राशीप्रवेश सर्वात शुभ मानला जातो. कारण याच दिवसापासून शुभ कार्यांची सुरूवात होते. शिवाय जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. परंतु काही राशींसाठी तो परिणाम सकारात्मक असतो, तर काही राशींसाठी नकारात्मकही असू शकतो.
advertisement
सूर्याचा मकरप्रवेश कितीही शुभ असला तरी त्याचा नकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पडला आहे. त्यांना संकटांचा सामना करावा लागणार हे निश्चित. झारखंडच्या देवघरचे ज्योतिषी आचार्य पंडित आनंद किशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्याची कृपादृष्टी असते, त्या व्यक्तींना सुखाचे दिवस अनुभवायला मिळतात, परंतु ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य अशुभ स्थानी असतो, त्यांना मात्र अनेक संकटांचा सामना करावा लागतो. सध्या या राशी आहेत तूळ, मकर आणि कुंभ.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण आलं, मिळालेल्या अक्षतांचं करायचं काय?
तूळ : आपल्याला करियरमध्ये अडचणी सहन कराव्या लागतील. आयुष्यात असा काही बदल होईल ज्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यात अडथळे येतील. आर्थिक नुकसानही होऊ शकतं. शिवाय बचत न झाल्याने नातेसंबंध बिघडू शकतात.
एकादशीला खाऊ नये तांदूळ! कारण वाचाल तर कधीच नाही खाणार
मकर : आपले जोडीदारासह खटके उडतील. दोघांमध्ये गैरसमज होऊ शकतात. आपल्याला नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात नफा होणार नाही. कामानिमित्त दूरचा प्रवास होईल, त्यातही तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
कुंभ : आपल्याला शारीरिक जखमा होऊ शकतात. त्यामुळे वाहन चालवताना, रस्त्यावरून चालताना जरा जपून. करियरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. कामं पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. कोणतंही कार्य सहजासहजी पूर्ण होणार नाही, त्यासाठी तुम्हाला दुप्पट खटाटोप करावा लागेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g