वाराणसी : देशात लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा एनडीएचा विजय झाला. आता देशाचे पुढचे पंतप्रधान कोण, हे अद्याप ठरलेलं नाही, परंतु नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणार अशी शक्यता नाकारता येत नाही. जर असं झालं तर ज्योतिषशास्त्रानुसार मोदींचा हा कार्यकाळ कसा असू शकतो याबाबत काशीचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, पुन्हा एकदा देश आर्थिकदृष्ट्या भक्कम होईल.
advertisement
खुद्द नरेंद्र मोदींच्या कुंडलीवरून ही भविष्यवाणी केल्याचा दावा ज्योतिषांनी केलाय. त्यांनी सांगितलं की, मोदींच्या कुंडलीत सध्या सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या गुरू ग्रहाकडून धनवर्षाव होतोय. जो चौथ्या स्थानी आहे. तर लाभकारक बुध ग्रह दहाव्या स्थानी आहे. त्यामुळे या 2 ग्रहांच्या युतीच्याच जोरावर भारत आर्थिकदृष्ट्या अत्यंत भक्कम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : सरकार स्थापनेच्या टेन्शनमध्ये सोशल मीडिया वर Memes चा पाऊस; पाहून आवरणार नाही हसू
तसंच आर्थिक बळावरच भारत संपूर्ण जगभरात ताकदवान होण्याची शक्यताही ज्योतिषांनी वर्तविली आहे. शिवाय येत्या 5 वर्षांमध्ये विकासकामंसुद्धा झपाट्याने होतील. सार्वजनिक सेवांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. देशातली रोजगाराची स्थितीही उत्तम असेल. शिवाय विदेशात भारताचं कौतुक होईल.
दहशतवाद राहील दूर!
या 5 वर्षांमध्ये देशापासून दहशतवाद कोसो दूर राहील. कारण मोदींच्या कुंडलीत शत्रू भावाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. जो सध्या लग्न स्थानात चंद्रासोबत विराजमान आहे. तर, शनी दहाव्या स्थानी ठाण मांडून बसलाय. त्यामुळे मागच्या 10 वर्षांप्रमाणेच येत्या 5 वर्षातही भारतापासून दहशतवाद दूर राहील.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.