TRENDING:

भाचीनं मामाच्या पायांना कधीच स्पर्श करू नये? शास्त्र सांगतं, मामा अडचणीत येतो!

Last Updated:

आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी आदर असतो हे खरंय. शिवाय त्या व्यक्तीलाही आपल्याला मनापासून आशीर्वाद द्यायचे असतात. परंतु...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम मरमट, प्रतिनिधी :
ज्योतिषशास्त्र सांगतं की, काही व्यक्तींच्या पायाला चुकूनही स्पर्श करू नये.
ज्योतिषशास्त्र सांगतं की, काही व्यक्तींच्या पायाला चुकूनही स्पर्श करू नये.
advertisement

उज्जैन : घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या पायाला स्पर्श करून आपण त्यांचे आशीर्वाद घेतो. विशेषतः घरी पाहुणे आले किंवा आपण कोणाकडे पाहुणे गेलो तर आपण असं सहज करतो. काही व्यक्तींविषयी आपल्या मनात एवढा आदर असतो की त्या समोर येताच आपण वाकून नमस्कार करतो. आपण आपल्या गुरूंच्या आणि गुरुसमान वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतो. परंतु तुम्हाला माहितीये का, याबाबत ज्योतिषशास्त्रात काही खास नियम दिलेले आहेत, जे आपल्याला कदाचित माहित नसू शकतात.

advertisement

ज्योतिषशास्त्र सांगतं की, काही व्यक्तींच्या पायाला चुकूनही स्पर्श करू नये. आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी आदर असतो हे खरंय. शिवाय त्या व्यक्तीलाही आपल्याला मनापासून आशीर्वाद द्यायचे असतात. परंतु आपण त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांना नकळतपणे अडचणीत टाकत असतो. असं नेमकं कधी घडतं, सविस्तरपणे जाणून घेऊया.

हेही वाचा : स्वप्नात शिवलिंग दिसण्याचा अर्थ काय असतो? खरंच महादेव संकेत देतात का?

advertisement

भाचा-भाची : शास्त्रांनुसार, भाचा-भाचीने आपल्या मामा-मामीच्या पायाला कधीच स्पर्श करू नये. शास्त्रांमध्ये भाचा-भाचीला पूजनीय मानलं जातं. त्यामुळे त्यांनी जर पायाला हात लावला तर मामा-मामीच्या डोक्यावरचे पाप वाढतात.

कन्या : शास्त्रांनुसार, कोणत्याच पित्यानं आपल्या मुलीला, भाचीला किंवा नातीला कधीच आपल्या पायाला स्पर्श करू देऊ नये. कारण या सर्व मुली देवीसमान असतात. त्यांचं स्थान पूजनीय असतं. त्यांनी पायाला स्पर्श केल्यास आपली पापं वाढतात.

advertisement

मंदिर : अनेकजण दररोज मंदिरात जातात. देवाची आपण मनोभावे पूजा करतो. परंतु देवासमोर कोणाचे पाय धरून आशीर्वाद घेणं अशुभ मानलं जातं.

स्मशानभूमी : शास्त्रांनुसार, स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या पायाला कोणीही स्पर्श करू नये. जर चुकूनही त्या व्यक्तीचे आशीर्वाद घेतले तर त्याचा त्रास त्या व्यक्तीलाच होतो. शिवाय स्मशानातून आलेल्या व्यक्तीने आंघोळ केल्याशिवाय तिला स्पर्शही केला जात नाही.

advertisement

झोपलेली व्यक्ती : एखादी व्यक्ती झोपली असेल तर तिच्या पायाला स्पर्श करू नये. असं केल्यास त्या व्यक्तीचं आयुष्य कमी होतं असं म्हणतात. कारण आपण मृत व्यक्तीच्या पायांना झोपलेल्या अवस्थेत स्पर्श करतो.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

मराठी बातम्या/अध्यात्म/
भाचीनं मामाच्या पायांना कधीच स्पर्श करू नये? शास्त्र सांगतं, मामा अडचणीत येतो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल