TRENDING:

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 5 उपाय नक्की करा! घराच्या धन-धान्यात होईल मोठी वाढ

Last Updated:

Buddha Purnima Upay 2025: बुद्ध पौर्णिमा हा दिवस हिंदू आणि बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि ते विष्णूंच्या नवव्या अवताराच्या रूपात पूजले जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बुद्ध पौर्णिमा हा दिवस हिंदू आणि बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि ते विष्णूंच्या नवव्या अवताराच्या रूपात पूजले जातात. म्हणूनच या दिवशी श्री बुद्ध आणि भगवान विष्णू यांची विशेष भक्तीभावाने पूजा केली जाते.
News18
News18
advertisement

या पवित्र दिवशी काही खास उपाय केले, तर केवळ अध्यात्मिक शांतीच नाही तर धन-संपत्ती आणि सौख्यही प्राप्त होऊ शकते, असा विश्वास आहे. ज्योतिषशास्त्रात याबाबतचे काही प्रभावी उपाय सुचवले आहेत, जे आपले जीवन सुखमय आणि समृद्ध करू शकतात.

बुद्ध पौर्णिमेसाठी प्रभावी उपाय

1) तुळशीच्या रोपाची पूजा करा

तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी, दूध आणि फुलं अर्पण करा आणि त्यावर लाल चुुंरी अर्पण करा. या पूजेमुळे घरात धन, ऐश्वर्य आणि समृद्धी टिकून राहते. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो.

advertisement

2) चंद्राला अर्घ्य द्या

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी चंद्र सोलह कला युक्त असतो. दूधात काही थेंब गंध किंवा गंगाजल टाकून अर्घ्य दिल्यास दुप्पट फल प्राप्त होते. यामुळे जीवनात शांती, समृद्धी आणि सुसंवाद वाढतो.

3) भगवान विष्णू आणि लक्ष्मीदेवीची पूजा करा

advertisement

या दिवशी फक्त बुद्धांचीच नव्हे तर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचीही विशेष पूजा केली जाते. विष्णूंना पिवळे फुल, वस्त्र आणि मिठाई अर्पण करा, तर लक्ष्मीदेवीला लाल फुलांनी पूजन करा. यामुळे घरात धनप्राप्ती आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहते.

4) पीपळाच्या झाडाजवळ दीप प्रज्वलित करा

संध्याकाळी पीपळाच्या झाडाखाली तूपाचा दीप लावा आणि घरच्या समृद्धीसाठी प्रार्थना करा. जर आपल्या राशीवर शनीची साडेसाती आहे, तर हा उपाय अत्यंत फलदायी मानला जातो आणि शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.

advertisement

5) लक्ष्मीदेवीला खीर अर्पण करा

रात्री खीर बनवून ती प्रथम लक्ष्मीदेवीला आणि नंतर चंद्राला अर्पण करा. हा उपाय घरात सतत धनप्रवाह राहण्यासाठी मदत करतो. विशेषतः ज्या घरात आर्थिक अडचणी असतात, तिथे हा उपाय अत्यंत लाभदायक ठरतो.

दरम्यान, बुद्ध पौर्णिमा हा केवळ भगवान बुद्धांच्या जन्माचा दिवस नसून, तो आध्यात्मिक उन्नती व आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी योग्य वेळ आहे. श्रद्धा आणि निष्ठेने केलेले हे उपाय तुमच्या जीवनात शुभ परिवर्तन घडवू शकतात

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 5 उपाय नक्की करा! घराच्या धन-धान्यात होईल मोठी वाढ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल