ऋषिकेश : ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवर आपलं सुख अवलंबून असतं. ग्रह-तारे प्रतिकूल स्थितीत असतील तर आपल्या आयुष्यात अप्रिय घटना घडतात. मग ज्योतिषांकडे आपण त्यावरील उपाय पाहतो. अशावेळी विविध रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे आपल्या अवतीभोवतीच्या सर्व अडचणी वेशीवरच थांबतात. आज आपण अशाच एका खास रत्नाविषयी जाणून घेणार आहोत.
उत्तराखंडचे ज्योतिषी प्रकाश जोशी यांनी मुंगा म्हणजेच पोवळे रत्नाची माहिती दिली, ज्याला इंग्रजीत कोरल म्हणतात. हे रत्न परिधान केल्यास व्यक्तीचा आत्मविश्वास बळावतो, असं ज्योतिषी म्हणाले. शिवाय विविध त्वचारोगांवरही हे रत्न गुणकारी आहे. पोवळे रत्नामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाची स्थिती भक्कम होते.
advertisement
उपाय अगदी सोपे पण रामबाण!...मग लक्ष्मी घरापासून दूर राहूच नाही शकणार
मंगळ ग्रहाचं स्थान कमकुवत असल्यास अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते. हे असे भयंकर अपघातात असतात ज्यात शरिरातून प्रचंड रक्तस्त्राव होतो. शिवाय आर्थिक नुकसानही तेवढंच होतं. कारण एकट्या मंगळाची स्थिती कधीच वाईट होत नाही. तर, मंगळ हा इतर एक किंवा दोन ग्रहांना सोबत घेऊनच आपली स्थिती बदलतो. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात एकामागून एक दुर्घटना घडतात. पोवळे परिधान केल्यास या दुर्घटनांपासून आपण आपलं संरक्षण करू शकतो.
चुकूनही घरात इथं करू नका पूजा, एकूण एकजण आजारी पडाल, आर्थिक नुकसानही होईल!
कसं परिधान करावं पोवळे?
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, पोवळ्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण तो विधीवत परिधान करतो. 4 ते 6 किंवा 5 ते 14 पोवळ्यांची माळ घालावी. कारण पेंडंटमधल्या पोवळ्यामुळे तेवढा सकारात्मक फायदा होत नाही, जेवढा त्याच्या माळेतून होतो. शिवाय मंगळवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर गंगाजलाने पुसून मगच पोवळे परिधान करावं. एकदा का पोवळे परिधान केलं की, त्यानंतर मग प्रत्येक मंगळवारी कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये. मांसाहारी पदार्थही खाऊ नये. दरम्यान, पोवळे रत्न परिधान केल्यानंतर अगदी सव्वा महिन्यातच गोष्टी मनासारख्या घडायला लागतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g