TRENDING:

चिरंजीवी हनुमानाचा जन्म नेमका कधी झाला? मारुतीच्या जन्माची 'ही' रहस्ये माहितीये का?

Last Updated:

चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला.त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. मात्र, हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्ये सांगितली जातात. हे जाणुन घेवुया पौराणीक विद्या अभ्यासक सुरज म्हशेळकर यांच्याकडून

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : हिंदू धर्मात राम आणि हनुमान भक्तीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच देशभरात हनुमान जयंतीला मोठा उत्साह असतो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले होते. त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. हनुमानाच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत. तसेच काही रहस्ये सांगितली जातात. याबाबत मुंबईतील पौराणिक विद्या अभ्यासक सुरज सदानंद म्हशेळकर यांच्याकडून जाणून घेऊ.

advertisement

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।

हनुमानाला मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते. हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे. हनुमंताला मारूती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते. हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुले, पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. तसेच हनुमानाला महादेव शिवशंकाराचा अवतार मानले जाते.

advertisement

Hanuman Jayanti 2024 : हनुमान चालीसाचं रोज करा पठण, होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे Video

अंजनीला मिळाले होते पायस

दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले होते. त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. मात्र, हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्ये सांगितली जातात. हनुमानाच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत. संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दलही अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते, असे म्हशेळकर सांगतात.

advertisement

चैत्र महिन्यात विजय महोत्सव

तामिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षात, तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला. चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते, हनुमान चिरंजीवी असल्याने तो आजदेखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमधे आहे.

advertisement

हनुमान जन्मोत्सवाला ही खबरदारी आवर्जून घ्या, आज कोणत्या गोष्टी टाळाल, आताच वाचा

शनिवार, मंगळवारी होते पूजा

हनुमानाला लावण्यात येणारा शेंदुर अत्यंत पवित्र मानला जातो. शरीर सौष्ठव कमविण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी, असे मानले जाते. हनुमान स्तोत्र व हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते, असे म्हटले जाते. साडे साती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. हनुमानाला शक्ती, स्फुर्ती आणि ऊर्जेचे प्रतिक मानण्यात आले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
चिरंजीवी हनुमानाचा जन्म नेमका कधी झाला? मारुतीच्या जन्माची 'ही' रहस्ये माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल