अयोध्या : दरवर्षी 21 जून हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहानं आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योगासनं करण्याचे शास्त्रीय आणि वैद्यकीयदृष्ट्या शरिराला अनेक फायदे आहेत. ज्योतिषशास्त्र सांगतं की, योगासनांमुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. परंतु या दिवशी जर प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या राशीनुसार योगासनं केली तर ती आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात.
advertisement
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, मानवी जीवनात ज्योतिषशास्त्राचा अत्यंत मोठा वाटा आहे. प्रत्येक व्यक्तीनं कोणतंही कार्य तिच्या राशीनुसार केलं तर तिला त्याचं निश्चितच शुभ फळ मिळू शकतं. अगदी योगासनंसुद्धा राशीनुसार केल्यास त्याचा दुप्पटीने आरोग्यदायी फायदा होऊ शकतो. दरम्यान, ज्योतिषांनी कोणत्या राशीसाठी कोणतं योगासन सांगितलंय, जाणून घेऊया.
मेष : या राशीच्या व्यक्तींनी भ्रामरी प्राणायाम आणि गौमुखासन करावं.
वृषभ : या राशीच्या व्यक्तींनी अनुलोम विलोम प्राणायम करावं.
मिथुन : या राशीच्या व्यक्तींनी गरुडासन करावं.
कर्क : या राशीच्या व्यक्तींनी त्राटक योग करावं.
सिंह : या राशीच्या व्यक्तींना प्रचंड ऊर्जावान मानलं जातं. त्यामुळे त्यांनी मंडूकासन म्हणजेच फ्रॉग प्रोझ आणि शवासन करावं.
कन्या : या राशीच्या व्यक्तींनी शीर्षासन करावं. त्यामुळे मानसिक स्थिती उत्तम राहते.
तूळ : या राशीच्या व्यक्तींनी अनुलोम विलोम प्राणायम करावं.
वृश्चिक : या राशीच्या व्यक्तींनी सूर्यनमस्कार करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरिरातल्या सर्व नसा भक्कम राहतात.
धनू : या राशीच्या वैक्तींनी नौकासन करावं.
मकर : या राशीच्या व्यक्तींनी वृक्षासन करावं, ज्यामुळे त्यांचं आरोग्य सुदृढ राहतं.
कुंभ : या राशीच्या व्यक्तींनी ताडासन, भुजंगासन आणि प्राणायम करावं.
मीन : या राशीच्या व्यक्तींनी हलासन करावं. त्यामुळे आजारपण दूर होतं.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.