तुळशीला स्पर्श करण्यासंबंधी धार्मिक नियमांविषयी जाणून घेऊया. तुळशीला स्पर्श करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा - सर्वसाधारणपणे सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी झाडांना पाणी देणे किंवा झाडांची पाने तोडू नयेत, असे सांगितले जाते. धार्मिक मान्यतांनुसार, सूर्यास्तानंतर संध्याकाळी, रात्रीच्या वेळेस तुळशीला स्पर्श करू नये.
शूज-चप्पल खरेदीसाठी हा दिवस टाळा, 90% लोक करतात चूक, सोबत घरी आणतात दारिद्र्य
advertisement
अस्वच्छ हात - तुळशीच्या रोपाला घाणेरड्या/अस्वच्छ हातांनी स्पर्श करणे टाळा. हात धुतल्यानंतरच तुळशीच्या रोपाला स्पर्श करावा. तुळशीची पूजा करणार असाल तर स्नान करूनच पूजा करा. घरातील देवांची पूजा केल्याशिवाय तुळशीची पूजा करू नये. तुळस आणण्याचा दिवस नवीन तुळस घरी आणणार असाल तर दिवसाचीही काळजी घ्या.
नवीन तुळशी खरेदीसाठी गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केली जाते. तुळशी भगवान विष्णूला प्रिय आहे, असे मानले जाते, त्यामुळे गुरुवारी तुळशी आणणे शुभ असते.
तुळशी कोणाला अर्पण करू नये -
भगवान शिव आणि गणपती बाप्पाला तुळशीची पाने अर्पण करू नयेत, अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला पूजेत तुळशीची पाने अर्पण केली जाऊ शकतात.
तुळशीचे रोप कसे लावावे - प्लास्टिकच्या भांड्यात तुळशीचे रोप लावणे योग्य नाही. वास्तूनुसार तुळशीचे रोप मातीच्या भांड्यातच लावावे. तुळशीचा चौथरा किंवा तुळश लावलेल्या भांड्यावर हळद आणि लिंबाच्या मिश्रणाने श्रीकृष्ण लिहिणे खूप शुभ मानले जाते.
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)