शिवलिंग स्थापनेसाठी आजचाच दिवस का? - पंचांगानुसार, आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी ही तिथी भगवान शिवशंकरांना समर्पित असून यालाच शिवरात्री मानले जाते. आज 17 जानेवारी रोजी पूर्ण दिवस चतुर्दशी तिथी असल्याने या भव्य शिवलिंगाच्या स्थापनेसाठी हा अत्यंत शुभ आणि विशेष दिवस निवडला गेला आहे. विशेष म्हणजे आजपासून बरोबर एका महिन्याने म्हणजेच 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे.
advertisement
स्थापना आणि पूजेचा मुहूर्त -
सहस्त्रलिंगम शिवलिंगाच्या स्थापनेची पूजा सकाळी 8 ते 10 या वेळेत पार पडेल. त्यानंतर सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 या वेळेत हवन केले जाईल. पंचांगानुसार सकाळी 08:34 ते 09:53 हा 'शुभ-उत्तम' मुहूर्त आहे, तर दुपारी 12:31 ते 01:50 हा 'चर-सामान्य' मुहूर्त आहे. या काळात 21 पंडित वैदिक मंत्रोच्चारात हा विधी पूर्ण करतील.
माघी गणेश जयंती नेमकी कधी? रवि योगात लागतोय भद्रकाळ, पूजा-मुहूर्त, महत्त्व
या शिवलिंगासाठी फूल, बेलपत्र आणि धोत्र्यापासून तयार केलेली 20 किलो वजनाची माळ अर्पण केली जाईल. मंदिराच्या सजावटीसाठी कोलकाता आणि कंबोडियातून तब्बल 3250 किलो फुले मागवण्यात आली आहेत. हवनावेळी 64 देवतांना आहुती दिली जाईल.
सहस्त्रलिंगम शिवलिंगाची वैशिष्ट्ये -
उंची आणि वजन: या शिवलिंगाची उंची 33 फूट असून वजन 210 टन आहे. जमिनीपासून 23 फूट उंचीच्या चौथऱ्यावर हे शिवलिंग बसवले जाईल, ज्यामुळे त्याची एकूण उंची 56 फूट होईल.
विशेष नाव: हे शिवलिंग काळ्या ग्रॅनाइट दगडापासून बनवले असून यामध्ये 1008 छोटे शिवलिंग कोरलेले आहेत, म्हणून याला 'सहस्त्रलिंगम' असे म्हटले जाते.
अमावस्या मौनी असल्यानं रविवारी केलेली 'ही' कामं मोठा परिणाम दाखवणार
निर्मिती: तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथे हे शिवलिंग घडवण्यासाठी 10 वर्षांचा काळ लागला आणि यासाठी सुमारे 3 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
प्रवास: 96 चाके असलेल्या एका मोठ्या ट्रकमधून 45 दिवसांचा प्रवास करून हे विशाल शिवलिंग महाबलीपुरम येथून कैथवलियाला आणले गेले.
विराट रामायण मंदिराची ही संकल्पना पाटणा येथील महावीर मंदिर न्यास समिती आणि आचार्य किशोर कुणाल यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत आहे.
