सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांसाठी हे रत्न अतिशय लाभदायक आहे. माणिक रत्न धारण करणाऱ्यांना शासकीय कामांमध्ये यश मिळतं. माणिक रत्नामुळे चेहऱ्यावर चांगली चमक येते. या रत्नाच्या चांगल्या प्रभावामुळे नोकरी आणि व्यापारामध्ये यश मिळतं. आत्मविश्वास वाढीसाठी देखील हे रत्न धारण केलं जातं.
फायदेशीर परिणाम
मेष, सिंह आणि धनु लग्न राशीच्या लोकांनी हे रत्न धारण करायला हवं. कर्क वृश्चिक आणि मीन लग्न राशी असणाऱ्या लोकांना हे रत्न अनुकूल मानलं जातं. मात्र, ज्यांच्या पत्रिकेमध्ये दहाव्या, नवव्या, पाचव्या आणि अकराव्या घरामध्ये सूर्याचे स्थान बळकट असतं अशा लोकांनी हे रत्न धारण केल्यास फायदा मिळतो. जन्म पत्रिकेमध्ये सूर्याचं स्थान बळकट नसेल तर माणिक रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
या जन्मतारखांची जोडी जमणं म्हणजे भाग्योदय! एकमेकांची साथ धरते प्रगतीची वाट
कोणत्या राशींनी धारण करू नये -
कन्या, मकर, मिथुन, तूळ आणि कुंभ लग्न राशीच्या लोकांनी चुकूनही हे रत्न धारण करू नये. ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य नीच स्थानी असेल त्यांनी हे रत्न घालू नये. जे लोक शनिशी संबंधित व्यापार करतात अशा लोकांना हे रत्न लाभदायक नाही. माणिक रत्न नीलम, हिरा किंवा गोमेद बरोबर परिधान केल्यास नुकसानदायक ठरतं. मात्र, मोती, पाचू, पुष्कराज बरोबर घालणं फायदेशीर आहे.
धारण करण्याचा विधी -
हे रत्न सोन्याच्या अंगठीमध्ये घालणं चांगलं असतं. शुक्ल पक्षाच्या पहिल्या रविवारी सूर्योदयानंतर करंगळीजवळच्या बोटामध्ये याची अंगठी घालावी. हे रत्न धारण करण्याच्या आदल्या रात्री गंगाजल मध, खडीसाखर, दूध यांच्या मिश्रणामध्ये बुडवून ठेवावे. सूर्योदयानंतर याची पूजा करावी ‘ओम ह्रां ह्रीं, ह्रौं सः सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करून ही अंगठी धारण करावी.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जन्माष्टमी! 2 शुभ योगात साजरा होणार कृष्णजन्मोत्सव
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
