वास्तुदोषामुळे एखाद्या व्यक्तीला सतत अडचणी येऊ शकतात. पण घोड्याच्या नालीच्या नियमांचं पालन करून आपण जीवनातील अडचणींपासून मुक्त होऊ शकता. वास्तुशास्त्रात घोड्याची नाल अतिशय शुभ मानली जाते. ती योग्य पद्धतीनं वापरल्यास आर्थिक संकटासारखी मोठी समस्याही दूर होते. घोड्याची नाल कशा पद्धतीने वापरायची जाणून घेऊ.
शनिदोष दूर करण्यासाठी -
कुंडलीत शनिदोष असल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर घराबाहेर घोड्याची नाल नक्कीच बसवा. त्यामुळे न्यायदेवता शनिदेव तुमच्यावर कृपा करतील, आणि प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील संकटे दूर करतील. कुंडलीतील शनिदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरेल.
advertisement
घरामध्ये नकारात्मकता असेल तर?
तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वाढू लागली असेल, सतत घरामध्ये वाद होत असतील, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल बसवा. यामुळे घरात सकारात्मकता वाढेल. कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील.
अशा गोष्टींचा वारंवार अनुभव येणं पुनर्जन्माचा संकेत! काय घडतं नेमकं?
असं करा आर्थिक संकट दूर
तुम्ही जर आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तुम्हाला आर्थिक दृष्टिनं यश मिळत नसेल, तर तुम्ही घोड्याची नाल लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा तुम्ही घरामध्ये पैसे ज्या ठिकाणी ठेवता, त्याठिकाणी ठेवा. असं केल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहिल.
भाग्योदय जवळ आलाय! लक्ष्मी-नारायण योगात या राशींची चांदी; खूप दिवसांनी अच्छे दिन
करिअरमध्ये मिळेल यश
कठोर परिश्रम केल्यानंतरही तुम्हाला करिअरमध्ये यश मिळत नसेल, तर तुम्ही शनिवारी मधल्या बोटात घोड्याच्या नालीपासून बनवलेली अंगठी घालावी. काही दिवसामध्येच तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील, व तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल.
दरम्यान, वास्तुशास्त्रानुसार घोड्याची नाल घरात ठेवल्यानं सुख-शांती तर मिळतेच पण पैशांची कमतरताही दूर होते. पण अनेकांना याबाबत फारशी माहिती नसते. खरतर वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, जे तुमच्या वास्तुचा दोष दूर करू शकतात. अर्थात त्यावर कितीपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मूलांक 4 असणाऱ्यांचे हे गुण चारचौघात उठून दिसतात; प्रेमळ-काळजी घेणारा स्वभाव
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)