Reincarnation: अशा गोष्टींचा वारंवार अनुभव येणं पुनर्जन्माचा संकेत! काय घडतं नेमकं?

Last Updated:

Reincarnation: या जन्मातल्या आपल्याशी संबंधित नसलेल्या आठवणीसुद्धा वारंवार आठवणे. विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल अकल्पनीय आत्मीयता वाटणे किंवा...

News18
News18
मुंबई : पुनर्जन्माबद्दल अनेक लोकांना आकर्षण असतं. आत्मा, पुनर्जन्म यांवर अनेकांचा विश्वास असतो. आपला पुनर्जन्म झाला आहे की नाही, याचे संकेत देणाऱ्या काही गोष्टी आयुष्यात घडत असतात. या जन्मातल्या आपल्याशी संबंधित नसलेल्या आठवणीसुद्धा वारंवार आठवत असतील, विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल अकल्पनीय आत्मीयता वाटत असेल, तर अशा गोष्टी तुमच्या आत्म्याने पुनर्जन्म घेतला आहे, याकडे संकेत करीत असतात. पुनर्जन्म झाल्याचे संकेत मिळू शकतात.
अचानक दुसरी भाषा बोलणं -
एखाद्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यात कधीही न वाचलेली, त्याला माहिती नसलेली, कधीही न ऐकलेली भाषा अचानक बोलण्यास सुरुवात केली, किंवा त्याला ती भाषा अगदी सहज समजू लागली, तर हा त्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाल्याचा संकेत असू शकतो. एखादी व्यक्ती अचानक दुसरी भाषा बोलू लागल्याचे प्रकार घडल्याचं अनेकदा तुम्ही ऐकलंही असेल. संमोहित झाल्यावर किंवा कोमातून बाहेर पडल्यावर एखादी व्यक्ती अचानक दुसरी भाषा बोलू लागते.
advertisement
जन्मखूण असणं -
एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर असणारी जन्मखूणसुद्धा पुनर्जन्माचा संकेत देत असते. ही जन्मखूण कधी कधी पूर्वजन्मातल्या आघाताची शारीरिक खूण मानली जाते. उदाहरणार्थ, कपाळावर मोठी जन्मखूण असेल, तर अशा व्यक्तीला मागच्या जन्मात तेथे मोठी दुखापत झालेली असू शकते.
advertisement
अनोळखी व्यक्तीबाबत खूप आत्मीयता -
कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीबाबत अचानक आत्मीयता वाटू लागते. संबंधित व्यक्तीसोबत स्वतःचे खूपच दृढ संबंध आहेत, असं वाटू लागतं. हादेखील पुनर्जन्माचा संकेत आहे. कारण पूर्वीच्या जन्मातल्या एखाद्या व्यक्तीशी आत्म्याचं कनेक्शन असतं, असं मानलं जातं.
तसंच कोणताही आजार नसताना अचानक सुरू झालेल्या वेदनाही पुनर्जन्माचे संकेत देतात. भीती वाटणं एखाद्या गोष्टीबाबत खूप भीती वाटणं, त्याबाबत फोबिया असणं, हेदेखील पुनर्जन्माचा संकेत देत असतं. कारण भूतकाळातल्या अनुभवांमधून अकल्पनीय आणि तीव्र भीती किंवा फोबिया होऊ शकतो. काहींचा असा विश्वास आहे की, भूतकाळातल्या आघातांचे प्रतिध्वनी भीतीच्या रूपात अनुभवता येतात.
advertisement
आयुष्याबाबत आपलेपणा न वाटणं - एखाद्याचं या जगात मन रमत नसेल, हे जग आपलं नाही आणि आपण इथले नाहीत, असं वाटणं हादेखील पुनर्जन्माचा संकेत मानला जातो. कारण अनेक वेळा पुनर्जन्म घेतलेले आत्मे पृथ्वीवरच्या जीवनाला कंटाळलेले/थकलेले असतात. त्यांना आता जन्माचं चक्र पूर्ण करून मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असते.
advertisement
स्वप्न - काहींना अशा ठिकाणांची, व्यक्तींची स्वप्नं पडत असतात, ज्यांना ती या जन्मात कधीच भेटलेली नसतात; पण त्यांना स्वप्नात येणारं ते ठिकाण, व्यक्ती खूप परिचित वाटत असतात. लहान मुलांच्या बाबतीत काही वेगळ्या गोष्टी घडतात, ज्यामध्ये लहान मुलं अशा काही आठवणींचं तपशीलवार वर्णन करू शकतात, ज्या त्यांनी कधीही अनुभवलेल्या नसतात. या आठवणी केवळ काल्पनिक वाटू शकतात; मात्र ही गोष्टदेखील पुनर्जन्माचे संकेत देणारी असते.
advertisement
स्वतःचं वय जास्त वाटणं बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला त्याचं स्वतःचं वय जास्त वाटू लागतं किंवा एखादी व्यक्ती लहान असतानाही मोठ्या व्यक्तीसारखे वागत असल्याचं जाणवतं, तर हेसुद्धा पुनर्जन्माचे संकेत देते. तुम्ही किती वेळा पुनर्जन्म घेतला हे तुमच्या उर्जेमध्ये परावर्तित होत असते.
आकर्षण, आत्मीयता वाटणं - एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथे यापूर्वीही आलेलो असल्यासारखं वाटणं, एखादं ठिकाण, संस्कृती किंवा वातावरणाबाबत एक अवर्णनीय आकर्षण, आत्मीयता वाटणं, हे सूचित करतं, की तुम्ही ते आधीच अनुभवलं आहे. प्राचीन ग्रीक संस्कृती, पहिलं महायुद्ध किंवा प्राचीन इजिप्शियन याच्याशी संबंधित अनेक उदाहरणं समोर येतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Reincarnation: अशा गोष्टींचा वारंवार अनुभव येणं पुनर्जन्माचा संकेत! काय घडतं नेमकं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement