Weekly Rashi Bhavishya In Marathi: आठवड्याच्या सुरुवातीलाच शनी उदय, या राशीच्या लोकांना दुहेरी लाभ; पहा साप्ताहिक राशीभविष्य

Last Updated:
Saptahik Rashibhavishy In Marathi: येणारा आठवडा कसा असेल, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं 11 मार्च ते 17 मार्च 2024 या आठवड्यासाठीचं राशिभविष्य..
1/12
मेष (Aries): आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यवसायाबाबत मोठे निर्णय घ्यावे लागतील. काही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी हितचिंतकांकडून सल्ला घेऊन अत्यंत हुशारीने या आव्हानांचा सामना करावा लागेल. या काळात विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकतं. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीबद्दल काळजी वाटेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या काळात मंदीचा सामना करावा लागू शकतो. पण, आठवड्याच्या मध्यात तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल. कार्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठांच्या सहकार्याने तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. एकंदरीत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कष्टाचं आणि प्रयत्नांचं फळ मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. मार्केटमध्ये अडकलेले किंवा एखाद्याला कर्ज म्हणून दिलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील. या काळात तुमचं वैवाहिक आयुष्य आनंदी असेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येईल.Lucky Color: Orange
Lucky Number: 7
मेष (Aries): आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यवसायाबाबत मोठे निर्णय घ्यावे लागतील. काही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी हितचिंतकांकडून सल्ला घेऊन अत्यंत हुशारीने या आव्हानांचा सामना करावा लागेल. या काळात विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकतं. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीबद्दल काळजी वाटेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या काळात मंदीचा सामना करावा लागू शकतो. पण, आठवड्याच्या मध्यात तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल. कार्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठांच्या सहकार्याने तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. एकंदरीत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कष्टाचं आणि प्रयत्नांचं फळ मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. मार्केटमध्ये अडकलेले किंवा एखाद्याला कर्ज म्हणून दिलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील. या काळात तुमचं वैवाहिक आयुष्य आनंदी असेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येईल.Lucky Color: Orange Lucky Number: 7
advertisement
2/12
वृषभ (Taurus):  आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमचा वेळ आणि पैसे व्यवस्थित सांभाळण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकतं. प्रयत्न केले तर तुमच्या बुद्धिमत्तेनं आयुष्यातील सर्व अडचणींवर उपाय शोधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. या आठवड्यात घाईघाईने काम करणं टाळा आणि गाडी जपून चालवा. नाहीतर दुखापत होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याशी तुमचा वाद झाला असेल तर आठवड्याच्या मध्यात ज्येष्ठांच्या मदतीने गैरसमज दूर होतील. या काळात तुम्ही तुमच्या भावंडांसोबत मिळून काम करण्याचा प्रयत्न कराल. जे लोक दीर्घकाळापासून बेरोजगार आहेत त्यांना इच्छित नोकरी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होईल आणि नवीन संपर्क वाढतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: White
Lucky Number: 15
वृषभ (Taurus):  आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमचा वेळ आणि पैसे व्यवस्थित सांभाळण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकतं. प्रयत्न केले तर तुमच्या बुद्धिमत्तेनं आयुष्यातील सर्व अडचणींवर उपाय शोधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. या आठवड्यात घाईघाईने काम करणं टाळा आणि गाडी जपून चालवा. नाहीतर दुखापत होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याशी तुमचा वाद झाला असेल तर आठवड्याच्या मध्यात ज्येष्ठांच्या मदतीने गैरसमज दूर होतील. या काळात तुम्ही तुमच्या भावंडांसोबत मिळून काम करण्याचा प्रयत्न कराल. जे लोक दीर्घकाळापासून बेरोजगार आहेत त्यांना इच्छित नोकरी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होईल आणि नवीन संपर्क वाढतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: White Lucky Number: 15
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर आठवड्याच्या सुरुवातीचा काळ तुम्हाला शुभफळ देईल. व्यवसायात प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात. प्रवास घडण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला इतरांशी असलेल्या दीर्घकालीन संबंधांच्या मदतीने आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. घरात आई-वडील आणि भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. गृहिणी आपला बहुतांशी वेळ धार्मिक गोष्टींसाठी खर्च करतील तर नोकरदार महिला घरी आणि कुटुंबासोबत राहण्याचा आनंद घेतील. जे उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत ते त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला या आठवड्यात ऑफिसमध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगली ऑफर मिळू शकते. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळा.Lucky Color: Yellow
Lucky Number: 2
मिथुन (Gemini) : आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर आठवड्याच्या सुरुवातीचा काळ तुम्हाला शुभफळ देईल. व्यवसायात प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात. प्रवास घडण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला इतरांशी असलेल्या दीर्घकालीन संबंधांच्या मदतीने आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. घरात आई-वडील आणि भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. गृहिणी आपला बहुतांशी वेळ धार्मिक गोष्टींसाठी खर्च करतील तर नोकरदार महिला घरी आणि कुटुंबासोबत राहण्याचा आनंद घेतील. जे उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत ते त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला या आठवड्यात ऑफिसमध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगली ऑफर मिळू शकते. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळा.Lucky Color: Yellow Lucky Number: 2
advertisement
4/12
कर्क (Cancer) : तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. यामुळे तुमच्यात एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा राहील. एखादी मोठी चांगली बातमी मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न होईल. मालमत्ता खरेदी-विक्रीचं स्वप्न साकार होऊ शकतं. या डीलमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळवणंदेखील शक्य होईल. तुम्हाला तुमच्या पालकांचं विशेष प्रेम आणि सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. बिझनेसशी संबंधित एखादी मोठी डील फिक्स होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होईल. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल असेल. नोकरदारांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त नवीन स्रोत उपलब्ध होतील. आठवड्याच्या मध्यात कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. या काळात तीर्थयात्रा घडण्याचीही शक्यता आहे.Lucky Color: Purple
Lucky Number: 3
कर्क (Cancer) : तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. यामुळे तुमच्यात एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा राहील. एखादी मोठी चांगली बातमी मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न होईल. मालमत्ता खरेदी-विक्रीचं स्वप्न साकार होऊ शकतं. या डीलमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळवणंदेखील शक्य होईल. तुम्हाला तुमच्या पालकांचं विशेष प्रेम आणि सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. बिझनेसशी संबंधित एखादी मोठी डील फिक्स होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होईल. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल असेल. नोकरदारांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त नवीन स्रोत उपलब्ध होतील. आठवड्याच्या मध्यात कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. या काळात तीर्थयात्रा घडण्याचीही शक्यता आहे.Lucky Color: Purple Lucky Number: 3
advertisement
5/12
सिंह (Leo) : तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठी संधी मिळू शकते. नशीब आणि कर्माच्या मदतीने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जवळचे मित्र आणि हितचिंतकांच्या मदतीने तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जर एखाद्या योजनेत किंवा बिझनेसमध्ये तुमचे पैसे अडकले असतील तर जवळच्या मित्रांच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने ते परत मिळवता येतील. सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. त्यांना एखादी मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकतं. तुमचे वरिष्ठ तुमच्याशी चांगेल वागतील. समाजात तुमची विश्वासार्हता आणि लोकप्रियता वाढेल. आठवड्याच्या मध्यात धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. या काळात तुम्ही पूजा, यज्ञ-विधी किंवा धार्मिक कारणासाठी प्रवास करू शकता. तुम्ही भौतिक सुखसोयींशी संबंधित मोठ्या वस्तू खरेदी करू शकता. नातेवाईकांच्या येण्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Brown
Lucky Number: 11
सिंह (Leo) : तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठी संधी मिळू शकते. नशीब आणि कर्माच्या मदतीने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जवळचे मित्र आणि हितचिंतकांच्या मदतीने तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जर एखाद्या योजनेत किंवा बिझनेसमध्ये तुमचे पैसे अडकले असतील तर जवळच्या मित्रांच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने ते परत मिळवता येतील. सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. त्यांना एखादी मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकतं. तुमचे वरिष्ठ तुमच्याशी चांगेल वागतील. समाजात तुमची विश्वासार्हता आणि लोकप्रियता वाढेल. आठवड्याच्या मध्यात धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. या काळात तुम्ही पूजा, यज्ञ-विधी किंवा धार्मिक कारणासाठी प्रवास करू शकता. तुम्ही भौतिक सुखसोयींशी संबंधित मोठ्या वस्तू खरेदी करू शकता. नातेवाईकांच्या येण्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Brown Lucky Number: 11
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती व्यवस्थित हाताळला तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकतं. नाहीतर तुम्हाला त्यासाठी थोडी वाट बघावी लागू शकते. आळस टाळावा लागेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी प्रतिकूल असू शकतो. तुमची दिनचर्या आणि आहार योग्य ठेवा. नाहीतर तुम्हाला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागेल. आठवड्याच्या मध्यात थोडा आराम मिळेल. ऑफिसमध्ये तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचं सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये इंटेन्सिटी राहील.Lucky Color: Gray
Lucky Number: 10
कन्या (Virgo) : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती व्यवस्थित हाताळला तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकतं. नाहीतर तुम्हाला त्यासाठी थोडी वाट बघावी लागू शकते. आळस टाळावा लागेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी प्रतिकूल असू शकतो. तुमची दिनचर्या आणि आहार योग्य ठेवा. नाहीतर तुम्हाला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागेल. आठवड्याच्या मध्यात थोडा आराम मिळेल. ऑफिसमध्ये तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचं सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये इंटेन्सिटी राहील.Lucky Color: Gray Lucky Number: 10
advertisement
7/12
तूळ (Libra) : आठवड्याच्या सुरुवातीला नशीबाची साथ मिळेल. तुमच्या हितचिंतकांच्या मदतीने तुमच्या व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील. व्यवसायात योग्य नियोजन करून काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल. तुमच्या आर्थिक उत्पन्नात सातत्य राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी ते अतिरिक्त उत्पन्नाचं साधन बनेल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध सुधारतील.Lucky Color: Pink
Lucky Number: 8
तूळ (Libra) : आठवड्याच्या सुरुवातीला नशीबाची साथ मिळेल. तुमच्या हितचिंतकांच्या मदतीने तुमच्या व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील. व्यवसायात योग्य नियोजन करून काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल. तुमच्या आर्थिक उत्पन्नात सातत्य राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी ते अतिरिक्त उत्पन्नाचं साधन बनेल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध सुधारतील.Lucky Color: Pink Lucky Number: 8
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आठवड्याची सुरुवात संमिश्र राहील. कामात अडथळे आल्याने मन थोडं उदास राहील. कोणाच्याही भरवशावर तुमचं काम सोडू नका किंवा तुमच्या योजना पूर्ण होण्यापूर्वी कोणाला सांगू नका. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. कारण, तुमचे विरोधक सक्रिय राहू शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील पूर्ण काळजी घ्यावी लागेल. विशेषत: हंगामी आजारांबाबत सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या मध्यात अचानक मोठे खर्च येऊ शकतात. त्यामुळे तुमचं बजेट थोडं विस्कळीत होऊ शकतं. या काळात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईने किंवा भावनेच्या भरात घेणं टाळा. व्यापाऱ्यांना व्यवसायात अडचणी येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी कठोर कष्ट घ्यावे लागतील. प्रेमसंबंधात सावधगिरीने पुढे जा. आपल्या जोडीदाराच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. कठीण काळात तुमचा जोडीदार सावलीसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील.Lucky Color: Maroon
Lucky Number: 3
वृश्चिक (Scorpio) : आठवड्याची सुरुवात संमिश्र राहील. कामात अडथळे आल्याने मन थोडं उदास राहील. कोणाच्याही भरवशावर तुमचं काम सोडू नका किंवा तुमच्या योजना पूर्ण होण्यापूर्वी कोणाला सांगू नका. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. कारण, तुमचे विरोधक सक्रिय राहू शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील पूर्ण काळजी घ्यावी लागेल. विशेषत: हंगामी आजारांबाबत सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या मध्यात अचानक मोठे खर्च येऊ शकतात. त्यामुळे तुमचं बजेट थोडं विस्कळीत होऊ शकतं. या काळात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईने किंवा भावनेच्या भरात घेणं टाळा. व्यापाऱ्यांना व्यवसायात अडचणी येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी कठोर कष्ट घ्यावे लागतील. प्रेमसंबंधात सावधगिरीने पुढे जा. आपल्या जोडीदाराच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. कठीण काळात तुमचा जोडीदार सावलीसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील.Lucky Color: Maroon Lucky Number: 3
advertisement
9/12
धनू (Sagittarius) :  आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या नातेसंबंधांची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही आळशीपणापासून आणि गोष्टी पुढे ढकलण्याच्या प्रवृत्तीपासून स्वतःचं रक्षण केलं तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकतं. नाहीतर तुम्हाला एखादी चांगली संधी गमावावी लागू शकते. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कष्टाचं आणि प्रयत्नांचं पूर्ण फळ मिळेल. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही परदेशात शिकण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. चिंतन करण्याची सवय लावा. वीकेंडमध्ये आवडत्या व्यक्तीच्या येण्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.Lucky Color: Magenta
Lucky Number: 1
धनू (Sagittarius) :  आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या नातेसंबंधांची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही आळशीपणापासून आणि गोष्टी पुढे ढकलण्याच्या प्रवृत्तीपासून स्वतःचं रक्षण केलं तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकतं. नाहीतर तुम्हाला एखादी चांगली संधी गमावावी लागू शकते. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कष्टाचं आणि प्रयत्नांचं पूर्ण फळ मिळेल. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही परदेशात शिकण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. चिंतन करण्याची सवय लावा. वीकेंडमध्ये आवडत्या व्यक्तीच्या येण्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.Lucky Color: Magenta Lucky Number: 1
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आठवड्याच्या सुरुवातीला विचारपूर्वक कामं केलं पाहिजेत. जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहेत त्यांच्यापासून तुम्ही योग्य अंतर राखलं पाहिजे. ऑफिसमधील कोणत्याही महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा दाखवू नका. नाहीतर तुम्ही तुमच्या बॉसच्या रागाला बळी पडू शकता. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. आर्थिक बाबतीत नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं तर लाभ होईल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर गोष्टींचा गुंता सोडवून पुढं जाणं योग्य ठरेल. आठवड्याच्या मध्यात मालमत्तेशी संबंधित प्रकरणं तुमच्या चिंतेचं कारण ठरू शकत. या कालावधीत तुम्हाला हंगामी आजारामुळे किंवा एखाद्या जुनाट दुखण्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता कमी असेल. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त झाल्यामुळे तुमचं बजेट विस्कळीत होऊ शकतं.Lucky Color: Cream
Lucky Number: 9
मकर (Capricorn) : आठवड्याच्या सुरुवातीला विचारपूर्वक कामं केलं पाहिजेत. जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहेत त्यांच्यापासून तुम्ही योग्य अंतर राखलं पाहिजे. ऑफिसमधील कोणत्याही महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा दाखवू नका. नाहीतर तुम्ही तुमच्या बॉसच्या रागाला बळी पडू शकता. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. आर्थिक बाबतीत नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं तर लाभ होईल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर गोष्टींचा गुंता सोडवून पुढं जाणं योग्य ठरेल. आठवड्याच्या मध्यात मालमत्तेशी संबंधित प्रकरणं तुमच्या चिंतेचं कारण ठरू शकत. या कालावधीत तुम्हाला हंगामी आजारामुळे किंवा एखाद्या जुनाट दुखण्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता कमी असेल. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त झाल्यामुळे तुमचं बजेट विस्कळीत होऊ शकतं.Lucky Color: Cream Lucky Number: 9
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला जवळचे मित्र आणि हितचिंतकांचं पूर्ण समर्थन आणि सहकार्य मिळेल. व्यावसायिक कारणांसाठी तुम्हाला लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी मोठ्या ऑफर मिळू शकतात. मार्केटमध्ये तुमची विश्वासार्हता वाढेल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यग्र राहाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ राहील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने एखादी मोठी समस्या सुटल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. नोकरदार महिलांचा कार्यालयातच नव्हे तर कुटुंबातही सन्मान वाढेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ ठरेल. जर तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमचे आधीपासून असलेले प्रेमसंबंध आणखी घट्ट होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Lavender
Lucky Number: 4
कुंभ (Aquarius) : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला जवळचे मित्र आणि हितचिंतकांचं पूर्ण समर्थन आणि सहकार्य मिळेल. व्यावसायिक कारणांसाठी तुम्हाला लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी मोठ्या ऑफर मिळू शकतात. मार्केटमध्ये तुमची विश्वासार्हता वाढेल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यग्र राहाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ राहील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने एखादी मोठी समस्या सुटल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. नोकरदार महिलांचा कार्यालयातच नव्हे तर कुटुंबातही सन्मान वाढेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ ठरेल. जर तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमचे आधीपासून असलेले प्रेमसंबंध आणखी घट्ट होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color: Lavender Lucky Number: 4
advertisement
12/12
मीन (Pisces) : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमुळे तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. आरोग्य तुमच्यासाठी खूप चिंतेचा विषय ठरू शकतं. जर तुम्हाला भूतकाळात एखाद्या आजाराने ग्रासलेलं असेल तर या आठवड्यात तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. ऑफिस किंवा व्यवसायात अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही उदास राहू शकता. तुमच्या आयुष्यात तात्पुरत्या स्वरुपाचे काही अडथळे येतील. आठवड्याच्या मध्यात बुद्धी आणि हितचिंतकांच्या मदतीने तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. आयुष्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी तुमचा जोडीदार खूप उपयुक्त ठरू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अजिबात हलगर्जीपणा करू नका. जोडीदार आणि कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाणं शक्य होईल. या काळात तुमचा जास्तीत जास्त वेळ धार्मिक-सामाजिक कार्यात जाईल. तुम्हाला आहाराची काळजी घेऊन हंगामी आजारांपासून सावध राहावे लागेल.Lucky Color: Peach
Lucky Number: 5
मीन (Pisces) : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमुळे तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. आरोग्य तुमच्यासाठी खूप चिंतेचा विषय ठरू शकतं. जर तुम्हाला भूतकाळात एखाद्या आजाराने ग्रासलेलं असेल तर या आठवड्यात तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. ऑफिस किंवा व्यवसायात अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही उदास राहू शकता. तुमच्या आयुष्यात तात्पुरत्या स्वरुपाचे काही अडथळे येतील. आठवड्याच्या मध्यात बुद्धी आणि हितचिंतकांच्या मदतीने तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. आयुष्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी तुमचा जोडीदार खूप उपयुक्त ठरू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अजिबात हलगर्जीपणा करू नका. जोडीदार आणि कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाणं शक्य होईल. या काळात तुमचा जास्तीत जास्त वेळ धार्मिक-सामाजिक कार्यात जाईल. तुम्हाला आहाराची काळजी घेऊन हंगामी आजारांपासून सावध राहावे लागेल.Lucky Color: Peach Lucky Number: 5
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement