अगदी बाबरी मशिद पाडल्यापासून ते भव्य राम मंदिराची उभारणी आणि रामलल्लांची प्रतिष्ठापना अशा सर्व ऐतिहासिक क्षणांचे सत्येंद्र दास साक्षीदार होते. तब्बल 34 वर्ष त्यांनी राम जन्मभूमी परिसरात श्रीरामांची सेवा केली. 28 वर्षे त्यांची पूजा केली. त्यानंतर 4 वर्षे ते राम मंदिरात पुजारी होते. मुख्य मंदिरात रामलल्लांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ते मुख्य पुजारी झाले.
advertisement
आचार्य सत्येंद्र दास उच्चशिक्षित होते. 1975 साली ते संस्कृत विद्यालयातून पदवीधर झाले. त्यानंतर 1976 साली त्यांनी अयोध्येच्या संस्कृत महाविद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी केली. 1992 साली त्यांची पुजारी म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांना केवळ 100 रुपये पगार होता, परंतु नंतर त्यांना बढती मिळाली. राम मंदिर ट्रस्टने सत्येंद्र दास यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रामनगरीच्या मठ, मंदिरांमध्येही शांती आहे.
सत्येंद्र दास हे मागील बऱ्याच काळापासून आजारी होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपर्वी ब्रेन हेमरेज झाल्यानंतर त्यांना पीजीआयमध्ये दाखल केलं होतं. 2 फ्रेब्रुवारीला स्ट्रोकमुळे सत्येंद्र दास यांना अयोध्येच्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथून पुढच्या उपचारांसाठी आधी ट्रामा सेंटर आणि मग लखनऊच्या एसजीपीजीआयमध्ये त्यांना पाठविण्यात आलं. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या गंभीर आजारांशीही ते लढा देत होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
