देवी शैलपुत्री कोण?
शैल म्हणजे पर्वत, म्हणूनच हिमालयाची कन्या पार्वतीला शैलपुत्री म्हटले जाते. भगवान शंकराची पत्नी असलेल्या या देवीचे वाहन वृषभ (नंदी बैल) आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. साधेपणा, दयाळूपणा आणि सौंदर्य यांचे मूर्तिमंत रूप असलेली ही देवी हिमालयावर विराजमान आहे. देवी शैलपुत्री कठोर तपश्चर्या करणारी, वन्य प्राण्यांची रक्षक आणि सर्व संकटांपासून मुक्ती देणारी मानली जाते.
advertisement
Ghatasthapana 2025: घटस्थापनेच्या दिवशी राहू काळ, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?
पहिल्या दिवशी देवीला कोणती माळ व नैवेद्य?
नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवीला विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते. तसेच या दिवशी देवीला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते.
या दिवशीचे विशेष महत्त्व
जो कोणी भक्त या दिवशी देवी शैलपुत्रीची भक्तिभावाने पूजा करतो, उपवास करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि देवीच्या कृपेने अपेक्षित फळ प्राप्त होते. संकटाच्या काळात देवी शैलपुत्री भक्तांचे रक्षण करते.
धार्मिक महत्त्वाचे मार्गदर्शन
या दिवशी भक्तांनी कुंजिका स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या स्तोत्राच्या पठणाने मन शुद्ध होते आणि नवरात्रीच्या उपासनेला पूर्णता मिळते.