वेरूळ येथील विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक गुजरात येथील महेंद्र बापू हे गेल्या 25 वर्षांपासून येथे स्थायिक झालेले आहेत. गरीब भक्तांना सर्व बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जाणे शक्य होत नाही, त्यामुळे बापू यांनी संकल्प केला होता की, वेरूळ येथे एकाच मंदिरात बारा ज्योतिर्लिंग स्थापित करायचे आणि ते केले सुद्धा जेणेकरून सर्व भाविक-भक्तांना या ठिकाणी सर्व बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येईल.
advertisement
Temple News: निसर्ग अन् शिवभक्तीचा अनोखा संगम, श्रीरामांनी केलं होतं इथं वास्तव्य, Video
त्यामुळे 2021-22 साली भव्य दिव्य असे 60 फुटांहून उंच भगवान महादेवाच्या विविध रूपांचे मंदिर उभारले. जवळपास या मंदिराला अडीच ते तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च लागला आहे, तसेच या ट्रस्टमार्फत अन्नदान देखील केले जाते, अशी माहिती बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली आहे.
श्री घृष्णेश्वराला येणारे भाविक-भक्त घृष्णेश्वराचे दर्शन झाल्यानंतर या बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. विशेष म्हणजे या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की, या मंदिरात एक वेळेस आवाज दिला तर तोच आवाज परत आपल्याला 108 वेळा ऐकायला मिळतो, असे देखील पाटील यांनी सांगितले.
या ठिकाणी सोमनाथ ज्योतिर्लिंग, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, केदारनाथ, भीमाशंकर, काशीविश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर, रामेश्वरम, शेवटचे मानले जाणारे बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर अशा सर्व महादेवाच्या बाराही रूपाचे आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन या ठिकाणी घडते, असे बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे पुजारी नरेश कुमार यांनी सांगितले.