गुरुपौर्णिमा म्हणजेच श्रद्धा आणि भक्तीचा सर्वोच्च दिवस जो आपल्या आध्यात्मिक गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनुपम योग आहे. या पवित्र दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांच्या ओघात श्रद्धेचा अजून एक प्रेरणादायी क्षण आज अनुभवायला मिळाला आहे. गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी एका अज्ञात साईभक्ताने सुमारे 2 किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे 59 लाख रुपये किंमतीचा 566 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे. तसेच साईबाबा संस्थानकडे देणगी स्वरूपात अर्पण केला आहे. दान केलेल्या साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
advertisement
या दानामध्ये निस्वार्थी भक्ती, भावनांची श्रीमंती आणि गुरूप्रतीची नितांत श्रद्धा दडलेली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सदर साईभक्ताचा सन्मान करण्यात आला. गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूंबद्दल असलेल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग मनात श्रद्धा असेल तर गुरुला दिलेली छोटी देणगी देखील मोठ्या देणगीत रूपांतर होते.
गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मशुद्धी, विनम्रता आणि गुरूंच्या कृपाशीर्वादाचा अनुभव घेण्याचा प्रसंग असतो. अशा पावन दिवशी साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले हे दान प्रत्येक भक्तासाठी श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे.