सातारा: महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक विहिरी तत्कालिन इतिहासाची आजही साक्ष देताना दिसतात. स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरात अशीच एक विहीर आहे. बाजीराव पेशवे यांनी बांधलेली विहीर बाजीराव विहीर म्हणूनच ओळखळी जाते. विशेष म्हणजे शुक्रवार पेठेत असणारी ही विहीर दोन मजली आहे. अत्यंत सुंदर दगडी बांधकाम आणि शंभर फुटावून जास्त खोली असलेल्या विहिरीनं कित्येक पिढ्यांची तहान भागवलीय. याबाबत वारसा संवर्धन आणि रान भैरी ट्रेकर्सचे धनंजय आवसरे यांनी माहिती दिली.
advertisement
सात कमानीची विहीर
बाजीराव विहिरीला एकूण सात कमानी आहेत. त्यामुळे सात कमानीची विहीर म्हणूनही विहिरीची ओळख आहे. विहिरीच्या मुख्य कमानीवर राज चिन्ह, दोन शरफ शिल्प आणि थोरले शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र यांचे शिल्प कोरलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विहिरींमध्ये बाजीराव पेशव्यांची विहीर ही तिसऱ्या क्रमांकावर येते. सध्या या विहिरीची मालकी छत्रपतींचे थेट तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्याकडे आहे.
जवानाने सीमेवर 17 वर्ष दिली सेवा! गावाकडे आल्यावर असा केला प्रयोग, सगळेच अवाक, Video
शाहूकालीन विहीर
सातारा शहराचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील ही विहीर असल्याचे सांगण्यात येते. या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येत असे. या विहिरीच्या वरच्या भागामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांची भेट होत होती. अनेक मोहिमा या विहिरीमध्ये भेट झाल्यानंतर ठरल्याचेही सांगण्यात येते. विशेष म्हणजे गेल्या 300 वर्षांच्या इतिहासात ही विहीर कधीही आटली नाही, असेही आवसरे सांगतात.
चक्क कंठावर गोंदली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सही, पाहा कारण काय Video
ऐतिहासिक विहीर पोस्ट कार्डवर
बाजीराव पेशवे विहिरीचं 2023 मध्ये राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त स्टेप वेल हेरिटेज अंतर्गत पोस्ट तिकीट बनवण्यात आलं. यामुळे ऐतिहासिक बाजीराव पेशवे विहिरीला मोठा सन्मान मिळाला आहे, अशी माहिती आवसरे यांनी दिली.