TRENDING:

Tirupati Balaji Mandir: तिरुपती बालाजी मंदिराविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील; दान करणाऱ्यांना तिथं...

Last Updated:

Tirupati Balaji Mandir: देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने लोक येथे येतात. रहस्यमय असलेले हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या श्रेणीत येते. लोक या मंदिरात पैसे, सोने, चांदी आणि केस देखील दान करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे, येथे प्रामुख्याने भगवान विष्णूचे अवतार श्री वेंकटेश्वर स्वामी यांची पूजा केली जाते. मंदिरात श्री वेंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने लोक येथे येतात. रहस्यमय असलेले हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या श्रेणीत येते. लोक या मंदिरात पैसे, सोने, चांदी आणि केस देखील दान करतात.
News18
News18
advertisement

धार्मिक श्रद्धेनुसार, येथे भाविकांना दान केलेल्या वस्तू किंवा पैशाच्या दुप्पट लाभ मिळतो. लोक भक्तीपोटी येथे कोट्यवधी रुपये दान करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की, तिरुपती बालाजी मंदिरात दान करणाऱ्या लोकांना त्यांच्या देणगीच्या रकमेनुसार काही विशेष सुविधा दिल्या जातात.

याविषयी तिरुपती मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे की, जर एखाद्या व्यक्तीने मंदिराला १ लाख ते ५ लाख रुपयांची देणगी दिली तर तो १ दिवसासाठी सुप्तम दर्शन घेऊ शकतो, त्यासोबत त्याला १०० रुपयांच्या शुल्कात ६ लहान लाडू, १ ब्लाउज, १ दुपट्टा आणि १ दिवसाची राहण्याची सुविधा मिळते.

advertisement

वर्ष 2027 पर्यंत या राशींना नो टेन्शन! शनिची साथ पाठीशी असल्यानं उच्च पद-पैसा

तिरुपती बालाजी मंदिरात ५ ते १० लाख रुपये देणगी देणाऱ्या व्यक्तीला सुपाथमद्वारे ५ इतर व्यक्तींसह ३ दिवसांचे दर्शन आणि १०० रुपयांच्या शुल्कात १० लहान लाडू, ५ महाप्रसाद, १ दुपट्टा आणि १ ब्लाउज पीससह ३ दिवसांची राहण्याची सोय मिळेल.

advertisement

१० लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्यांना - तिरुपती बालाजी मंदिरात १० ते २५ लाख रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना ५ इतर लोकांसह ३ दिवसांसाठी ब्रेक दर्शनाची सुविधा, २० लहान लाडू, १० महाप्रसादाचे पॅकेट, एक दुपट्टा, एक ब्लाउज आणि ५० ग्रॅमचे चांदीचा नाणे आणि १,००० रुपयांच्या खोलीच्या निवासाची सुविधा मिळेल.

advertisement

२५ ते ५० लाख रुपयांपर्यंत देणगी- तिरुपती बालाजी मंदिरात २५ ते ५० लाख रुपये दान केले तर एका दिवसासाठी सुप्रथम दर्शन घेऊ शकता आणि इतर ५ लोकांसह ३ दिवस दर्शन करू शकता. यासोबतच, त्यांना ४ मोठे लाडू, ५ लहान लाडू, १० महाप्रसाद, १ ब्लाउज, १ दुपट्टा, १ सोन्याचे नाणे (५ ग्रॅम) आणि एक चांदीचे नाणे (५० ग्रॅम) दिले जाते आणि ३ दिवसांसाठी १५०० रुपयांची खोली राहण्याची सोय केली जाते.

advertisement

५० लाख ते ७५ लाख रुपये - तिरुपती बालाजी मंदिरात ५० लाख ते ७५ लाख रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांना ४ इतर लोकांसह एक दिवस श्रीवरी सुप्रभात सेवेचे दर्शन, ३ दिवस ब्रेक दर्शन आणि २ दिवस सुप्तम दर्शन घेता येईल. याशिवाय, त्यांना ६ मोठे लाडू, १० लहान लाडू, एक दुपट्टा, एक ब्लाउज, १० महाप्रसादाचे पॅकेट, १ सोन्याचा डॉलर (५ ग्रॅम) आणि एक चांदीचे नाणे (५० ग्रॅम) आणि २००० रुपये किमतीचे ३ दिवसांसाठी खोलीची सोय दिली जाईल.

बजरंगबली पावणार! हनुमान जयंतीला या मंत्राचा जप इच्छित फळ मिळवून देईल

७५ लाख ते १ कोटी - ७५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांना २ दिवस श्रीवारी सुप्रभात सेवेचे दर्शन, ३ दिवस ब्रेक दर्शन आणि ३ दिवस सुप्तम दर्शन घेता येईल. याशिवाय, त्यांना ८ मोठे लाडू, १५ लहान लाडू, एक दुपट्टा, एक ब्लाउज, १० महाप्रसादाचे पॅकेट, १ सोन्याचे नाणे (५ ग्रॅम) आणि एक चांदीचे नाणे (५० ग्रॅम) आणि २५०० रुपये किमतीचे ३ दिवसांसाठी खोलीची सोय दिली जाईल.

१ कोटी किंवा त्याहून अधिक दान -  तिरुमला मंदिरात १ कोटी रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना ३ दिवसांसाठी श्रीवरी सुप्रभात सेवा दर्शन, ४ दिवसांसाठी इतर ४ लोकांसह ब्रेक दर्शन आणि ४ दिवसांसाठी सुप्तम दर्शनाची सुविधा मिळेल. याशिवाय, १० मोठे लाडू, २० लहान लाडू, एक दुपट्टा, एक ब्लाउज, १० महाप्रसादाचे पॅकेट, १ सोन्याचे नाणे (५ ग्रॅम) आणि एक चांदीचे नाणे (५० ग्रॅम), एक वेळचे वैदिक आशीर्वाद आणि ३ दिवसांसाठी ३००० किमतीच्या खोलीच्या निवासाची सोय दिली जाईल.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Tirupati Balaji Mandir: तिरुपती बालाजी मंदिराविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील; दान करणाऱ्यांना तिथं...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल