TRENDING:

#RamAayenge : रामभक्तीच्या प्रेरणेने CEO पदाचा दिला राजीनामा, तुरुंगात दिवाळी ते आता अयोध्येतील कार्यक्रमाचं आमंत्रण

Last Updated:

प्रोफेसर गुप्ता कारसेवक म्हणून विविध ठिकाणी फिरायचे आणि जिथे जागा मिळेल तिथे झोपायचे, जे अन्न मिळेल ते खायचे. अनेक वेळा काही न खाता त्यांना अनेक दिवस काढावे लागले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल झा, प्रतिनिधी
प्राध्यापक हर प्रसाद गुप्ता
प्राध्यापक हर प्रसाद गुप्ता
advertisement

गाझियाबाद : 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. राम मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा उत्साह संपूर्ण देशात दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमामध्ये यजमानाच्या भूमिकेत असतील. या कार्यक्रमात अतिशय निवडक अशा लोकांना बोलावण्यात आले आहे.

याच यादीमध्ये आता गाझियाबादच्या आयएमई कॉलेजचे चेअरमन प्राध्यापक हर प्रसाद गुप्ता यांचाही समावेश झाला आहे. राम मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांनाही मिळाले आहे. प्राध्यापक गुप्ता राम भक्तीचे एक अनोखे उदाहरण आहे. आयुष्यातील सर्व सुख-सुविधा नाकारून त्यांनी रामभक्तीचा मार्ग अवलंबलवा आणि गाझियाबादमधील राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.

advertisement

पदाचा दिला राजीनामा -

1990 च्या दशकात, जेव्हा राम मंदिर आंदोलन तीव्र स्वरुपात होते, तेव्हा हरप्रसाद गुप्ता मोदी इंडस्ट्रीजचे सीईओ होते. पण यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा तुरुंगात गेले तेव्हा मालकांना ते आवडले नाही आणि प्रोफेसर गुप्ता यांनी राजीनामा दिला. सीईओ पदावरुन राजीनामा दिल्यानंतर प्रोफेसर गुप्ता यांनी राम मंदिर आंदोलनात सक्रिय भूमिका बजावण्यास सुरुवात केली.

advertisement

#RamAayenge : राम मंदिराचा पाया कसा रचला गेला?, 34 वर्षांपूर्वी अयोध्येत काय घडलं? वाचा, ऐतिहासिक माहिती

“एक वीट, एक रुपया अभियान” -

प्राध्यापक हर प्रसाद गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली गाझियाबादमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी “एक वीट, एक रुपया अभियान” सुरू करण्यात आले. तसेच जास्तीत जास्त लोक राम मंदिर आंदोलनाशी जोडले जातील यासाठी गाझियाबाद ते अयोध्येपर्यंत राम जानकी रथ, राम ज्योती यात्रा काढण्यात आली. त्यावेळी प्रोफेसर गुप्ता कारसेवक म्हणून विविध ठिकाणी फिरायचे आणि जिथे जागा मिळेल तिथे झोपायचे, जे अन्न मिळेल ते खायचे. अनेक वेळा काही न खाता त्यांना अनेक दिवस काढावे लागले.

advertisement

तुरुंगात साजरा केली दिवाळी -

प्राध्यापक गुप्ता यांनी सांगितले की, राम मंदिर आंदोलनादरम्यान, गाझियाबादमध्ये खूप सुरक्षेचा चोख बंदोबस्त असायचा. अशावेळी शेतांमधून अयोध्येला जावे लागायचे. त्यावेळी मी शेतकऱ्याच्या वेशात असायचो आणि खिशात हरबरे ठेवायचो. त्यावेळी झोपताना पोलीस छापा टाकायचे. मात्र, पोलिसांना चकमा देण्यासाठी जनावरांना चारा दिल्या जाणाऱ्या तबेल्यात चादर पांघरून झोपायचे. गाझियाबादच्या लोकांचे मंदिर संघर्षात खूप महत्त्वाचे योगदान होते. त्यावेळी 5,500 लोक तुरुंगात होते. त्या काळात मी तुरुंगात दिवाळीचा सणही साजरा केला, असेही त्यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
#RamAayenge : रामभक्तीच्या प्रेरणेने CEO पदाचा दिला राजीनामा, तुरुंगात दिवाळी ते आता अयोध्येतील कार्यक्रमाचं आमंत्रण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल