TRENDING:

स्वप्नात शिवलिंग दिसण्याचा अर्थ काय असतो? खरंच महादेव संकेत देतात का?

Last Updated:

काही स्वप्नांकडे दुर्लक्ष करणं अवघड होतं. एकतर ती आपल्या मनात धडकी भरवतात किंवा आपल्याला विचारात पाडतात. काही स्वप्न मात्र खूप सुखद असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
प्रत्येक स्वप्नामागे काहीना काहीतरी अर्थ दडलेला असतो.
प्रत्येक स्वप्नामागे काहीना काहीतरी अर्थ दडलेला असतो.
advertisement

अयोध्या : झोपेत स्वप्न पडणं सर्वसामान्य आहे. प्रत्येक व्यक्तीला झोपेत स्वप्न पडतातच. काही स्वप्न आपण सहज दुर्लक्षित करतो, परंतु काही स्वप्नांकडे दुर्लक्ष करणं अवघड होतं. एकतर ती आपल्या मनात धडकी भरवतात किंवा आपल्याला विचारात पाडतात. काही स्वप्न मात्र खूप सुखद असतात. झोपेत आपल्याला साक्षात देवदर्शन घडलेलं असतं. तुम्हाला माहितीये का, ज्योतिषशास्त्र सांगतं की, प्रत्येक स्वप्नामागे काहीना काहीतरी अर्थ दडलेला असतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया स्वप्नात शिवलिंग दिसल्यास त्यामागे नेमका काय अर्थ असतो.

advertisement

असं म्हणतात की, स्वप्न भविष्यात आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात सतत शिवलिंग दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं. याचा अर्थ असतो की देवांचे देव महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळालाय. त्यामुळे प्रामुख्याने आपल्या आर्थिक समस्या संपुष्टात येण्याच्या मार्गावर असतात.

हेही वाचा : Modi 3.0: पुन्हा पंतप्रधान झाल्यास कसा असेल मोदींचा कार्यकाळ? ज्योतिषांनी कुंडलीच काढली

advertisement

स्वप्नात जर पांढऱ्या रंगाचं शिवलिंग दिसलं, तर आरोग्याविषयीच्या सर्व तक्रारी दूर होतात. शिवाय मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन नशीब चांदीसारखं चमकण्याची शक्यताही निर्माण होते. जर तुम्ही स्वप्नात शिवलिंगाला दुग्धाभिषेक केला, तर महादेव तुम्हाला प्रसन्न झाल्याचा हा संकेत असतो. शिवाय स्वप्नात शिवलिंगाची पूजा करणंही अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते.

advertisement

स्वप्नात जर आपण शिवलिंगाचं दर्शन घेत असाल, तर ब्रह्म मुहूर्तावर उठून शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला जलाभिषेक करावा. शिवलिंगाची विधीवत पूजा करावी. यामुळे महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि अडचणी दूर होतात.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

मराठी बातम्या/अध्यात्म/
स्वप्नात शिवलिंग दिसण्याचा अर्थ काय असतो? खरंच महादेव संकेत देतात का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल