भगवान परशुरामाने घातला आईसाठी गोंधळ
गोंधळ जगदंबेचा हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. सर्वप्रथम गोंधळ बाळ परशुरामाने रेणुका मातेच्या सुख शांततेसाठी इंद्राच्या सभेवरती घातला. दुसरा गोंधळ ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. तिसरा गोंधळ तुकाराम महाराजांनी वाळवंटी तिरी घातला. चौथा गोंधळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस तोरणागड जिंकला त्यावेळेस जगदंबा भवानी मातेच्या नावाचा गोंधळ घातला. आणि आता गोंधळ घालतो तो कलियुगामध्ये. जर आपल्या घरी आराध्य दैवत, कुलदैवत जगदंबा भवानी माता कुलस्वामिनी असेल आणि आपल्या घरी कोणतही शुभ कार्य असलं, लग्न, बारसे किंवा मौंज, या शुभकार्यप्रसंगी भवानीचा गोंधळ घातला जातो आणि नंतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते, असे गोंधळी राजीव कानडे सांगतात.
advertisement
तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर? Video
घरात संबळ वाजवून जागर केल्याने संकट दूर होतात
नवरात्रीत घरात सांभाळाचा निनाद केला आणि घरात आई जगदंबेचा जागर करून संबळ वाजवून गोंधळ घातल्याने जगदंबा भवानीला गोंधळाच्या माध्यमातून आईला विनवणी केली जाते. भजन, देवीच्या आरत्या, जोगवा, संबळाच्या माध्यमातून आणि आपल्या मागे काही शनी चक्र ग्रह किंवा संकट असली तर आई जगदंबा भवानी ते दूर सारते. अशी श्रद्धा भक्तांची असते त्यामुळे अनेक भाविक विशेषतः नवरात्रीत आपल्या घरी गोंधळ यांना बोलवून घेत घरात संबळाचा निनाद करतात आणि घरी जगदंबेचा उदो उदो केला जातो.
महाराष्ट्रातील 'हिंदुस्थानी' देवीचं मंदिर माहितीये का? ब्रिटिश काळाशी आहे संबंध, Video
लग्नाच्या आधी होतो जागरण गोंधळ
गोंधळ लग्नाच्या अगोदर घातल्या जातो, समजा आपल्याकडे मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे, तेव्हा वर मुलगा किंवा वधू मुलीच्या हाताने जगदंबा भवानी मातेची प्रतिमा पंचमृताने धुतल्या जाते आणि तिची स्थापना करून गोंधळ घातला जातो आणि नवरात्रमध्ये जगदंबा भवानी मातेच्या मंदिरामध्ये, नवदुर्गा मंडळामध्ये गीत गायले जाते आणि गोंधळ घातला जातो. गोंधळी नवरात्रमध्ये घरोघरी फिरून जोगवा मागतात आणि आई भवानीचे गीत सादर करून जल्लोष करतात घरोघरी जाऊन संबळ वाजवून आई जगदंबा मातेला प्रसन्न करतात. त्यानंतर ज्या भाविकांच्या घरी संबळ वाजवतात ते भाविक गोंधळीच्या झोळीत काही दक्षिणा आणि मनोभावे काही धान्य देतात,अशी माहिती गोंधळी राजीव कानडे यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)