मी पराभवाची जबाबदारी घेईन - अजिंक्य रहाणे
स्पष्टीकरण देण्यासारखे काहीही उरलेले नाही, तिथे काय घडले ते आपण सर्वांनी पाहिले. प्रयत्नांमुळे खूप निराश झालो. मी पराभवाची जबाबदारी घेईन, चुकीचा शॉट खेळला, असं म्हणत रहाणेने स्वत:ला दोषी ठरवलं. मात्र, अंगक्रिश देखील चुकला. मला फारशी खात्री नव्हती. अंगक्रिश म्हणाला की हा पंचांचा निर्णय असू शकतो. मला त्यावेळी कोणताही धोका पत्करायचा नव्हता, मलाही खात्री नव्हती, असं अजिंक्य रहाणे म्हणाला. आम्ही फलंदाजी करताना खूपच वाईट कामगिरी केली, आम्ही संपूर्ण जबाबदारी घेतो, असंही अजिंक्य रहाणे म्हणाला आहे.
advertisement
मला स्वतःला शांत ठेवावं लागतं...
आम्ही निष्काळजी होतो आणि आम्हाला पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी. यावेळी माझ्या मनात बऱ्याच गोष्टी चालू होत्या. आमच्यासाठी हे एक सोपे लक्ष्य होते. जेव्हा मी वर जातो तेव्हा मला स्वतःला शांत ठेवावे लागते आणि नंतर मुलांना काय बोलावे याचा विचार करावा लागतो, असं म्हणत अजिंक्यने मनाचा मोठेपणा दाखवला. तरीही सकारात्मक राहावे लागते. अर्धी स्पर्धा अजून बाकी आहे. यावर लक्ष केंद्रित करावे लागते आणि पुढे जावे लागते, असंही अजिंक्य रहाणे यावेळी म्हणाला आहे.
पंजाब किंग्जने दिलेल्या 112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खूपच खराब झाली. सामन्यात रहाणेने 17 धावा केल्या. यानंतर, रघुवंशीही १० व्या षटकात बाद झाला. यानंतर, पुढच्याच षटकात मॅक्सवेलने वेंकटेश अय्यरला बाद केले.मार्को जॅन्सनने हर्षित राणाला 3 धावांवर क्लिन बोल्ड केले. पंजाबकडून युझवेंद्र चहलने 4 विकेट,मार्को जॅनसन 3, झेव्हियर ब्रॅटलेट, अर्शदिप सिंह आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. त्यानंतर वैभव अरोराने अर्शदिप सिहने शून्य धावांवर बाद केले.