काय म्हणाली एमिलिया केर?
एमिलिया केरने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एक किस्सा सांगितला. जेव्ही मी शाळेत शिकत होते, तेव्हा मी एक निबंध लिहिला होता. त्यात मी लिहिलं होतं की, मी एक दिवस सोफी डेविन आणि सुझी बेट्ससोबत वर्ल्ड कप जिंकेल. पण आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. आज ते शब्द खरे ठरल्याने मला भावना अनावर झाल्या, असं एमिलिया केरने म्हटलं आहे.
advertisement
मला आज जाणवलेली भावना खरंच खूप खास होती, न्यूझीलंडच्या दोन स्टार खेळाडूंसोबत खेळणं अन् वर्ल्ड कप जिंकणं ही खरंच मोठी भावना आहे, असं एमिलिया केरने म्हटलं आहे. माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी हा सर्वात मोठा क्षण आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो, त्यामुळे हा आनंद आमच्यासाठी कधीही न संपणारा आहे. मला नक्कीत गर्व वाटतो की मी या संघाचा भाग आहे, असं एमिलियाने म्हटलं आहे.
दरम्यान, एमिलिया केर हिने न्यूझीलंडसाठी आतापर्यंत 74 एकदिवसीय सामन्यात 2082 धावा केल्या असून एकदिवसीय सामन्यात केरच्या नावावर 91 विकेटही जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद 232 हा तिचा सर्वोत्तम स्कोर आहे. तर 85 टी-20 सामन्यात तीने 1296 धावा आणि 93 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये देखील तिने उल्लेखनिय कामगिरी केली. त्यामुळे न्यूझीलंडसाठी ती खरी हिरो ठरली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.