खरं तर टीम इंडिया वेगवान गोलंदाज म्हणून अनुभवी जसप्रीत बुमराह, अर्शदिप सिंह, हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला आहे. या गोलंदाजासोबत पार्ट टाईम गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याचा देखील समावेश असणार आहे.आता पाहायला गेला तर जसप्रीत बुमराह, अर्शदिप सिंह, हर्षित राणा या तीन गोलंदाजांपैकी जास्तीत जास्त दोन गोलंदाजांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
आता जसप्रीत बुमराहला त्याच्या अनुभवाच्या आणि तीक्ष्ण गोलंदाजीच्या बळावर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणारच आहे. राहता राहिला दुसरा वेगवान गोलंदाजाचा प्रश्न तर एक अर्शदिप सिंह किंवा हर्षित राणा या दोघांपैकी एकाची संघात वर्णी लागणार आहे. पण सध्या ब्रॉको टेस्टवर नजर टाकल्यास अर्शदिप सिंहने संपूर्ण संघातून सर्वांधिक गुण मिळवले आहे. विशेष म्हणजे त्याने या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला देखील पछाडलं आहे.त्यामुळे अर्शदिपची ही कामगिरी पाहता प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी देण्याबाबत आधी विचार होईल. त्यानंतर गंभीरचा लाडका हर्षित राणाचा विचार होईल. त्यामुळे जर असं झालं तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदिप सिंह हे दोनच वेगवान गोलंदाज संघात असतील आणि गंभीरचा लाडका हर्षित राणाला संपूर्ण आशिया कप बेंचवर बसून काढावा लागणार आहे.
आता गौतम गंभीर आणि कर्णधार सुर्यकुमार यादव प्लेइंग इलेव्हनबाबत काय निर्णय घेतात. हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देतात की अर्शदिप सिंहची वर्णी लावतात हे सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे.
'या' खेळाडूंकडून फिटनेस टेस्ट पास
साधारण एका आठवड्यापुर्वी बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये भारतीय खेळाडूंची फिटनेस टेस्ट पार पडली होती. ही ब्रॉको टेस्ट सर्वच खेळाडूंनी पास कली आहे. रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर,शुभमन गिल, अर्शदिप सिंह आणि जसप्रीत बुमराह अशा खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदिप सिंहने ब्रॉको टेस्टमध्ये टॉप केले आहे. जसप्रीत बुमराहसह इतर खेळाडूंच्या तुलनेत अर्शदिप सिंहची फिटनेस टेस्ट वेगळ्या लेवला आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, संजू सॅमसन, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षीत राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती