आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या अर्शदीप सिंगला या सामन्यात संधी मिळालेली नाही. जसप्रीत बुमराह याच्याकडे भारताच्या फास्ट बॉलिंगची धुरा असेल. जसप्रीत बुमराहसोबत ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे फास्ट बॉलिंगमध्ये टीमला मदत करतील. जसप्रीत बुमराह हा 2024 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलनंतर पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळत आहे.
तीन स्पिनरना संधी
advertisement
युएईविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाकडे 3 स्पिनर आहेत. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती, चायनामन कुलदीप यादव आणि डावखुरा स्पिनर अक्षर पटेल यांना प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. दुबईमधील खेळपट्टी संथ आणि स्पिन बॉलिंगला मदत करणारी असल्यामुळे भारताने 3 स्पिनर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी फेब्रुवारी-मार्च महिन्यात युएईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती, तेव्हाही रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने फास्ट बॉलिंगपेक्षा स्पिनरवरच जास्त विश्वास दाखवला होता, याचा फायदा टीम इंडियाला झाला आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला.
भारताची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती