TRENDING:

Asia Cup आधी मोठा धक्का? भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून संजूचा पत्ता कट? गंभीरच्या हुकमी एक्क्याला संधी

Last Updated:

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून संजू सॅमसनचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. संजूच्या जागी आता गौतम गंभीरच्या हुकमी एक्क्याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Asia Cup 2025 News : आशिया कप सुरू व्हायला अवघे 7 दिवस उरले आहे. याआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून संजू सॅमसनचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. संजूच्या जागी आता गौतम गंभीरच्या हुकमी एक्क्याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे?हे जाणून घेऊयात.
asia cup 2025
asia cup 2025
advertisement

खरं तर भारताने आशिया कप 2025 साठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पण या 15 खेळाडूंमधून प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आहे, हे सामन्या दरम्यानच स्पष्ट होणार आहे. पण त्याआधीच प्लेइंग इलेव्हन बाबत विविध कयास लावले जात आहेत. त्यात आता भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाण भारताच्या आशिया कपमधील सलामीवीरांबाबत मोठं भाकीत केलं आहे.

advertisement

टीम इंडिया अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोन सलीमीवीरांसोबत मैदानात उतरणार आहे.पण संघात टेस्टचा कर्णधार शुभमन गिलची एंन्ट्री झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. शुभमन गिल देखील फलंदाजीला उतरू शकतो.त्यामुळे इरफान पठाणने संजू सॅमजनचा प्लेइंग इलेव्हन मधून पत्ता कट होईल किंवा पाचव्या क्रमांकावर खेळवले जाईल असे सांगितले आहे. तर संजूच्या जागी शुभमन गिल सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात उतरेल.त्यामुळे इरफानच्या या अंदाजानुसार संजू सॅमसनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

advertisement

इरफान पठाणचा असा विश्वास आहे की शुभमन गिलला आशिया कपसाठी सलामीवीर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.तर संजू सॅमसनला वगळले जाऊ शकते किंवा पाचव्या क्रमांकावर ढकलले जाऊ शकते.त्यामुळे इरफान पठाणच्या विधानानुसार संजूला मोठा झटका बसला आहे.

आशिया कपमध्ये खेळण्याआधी संजू सॅमसन केरला क्रिकेट लीगमध्ये खेळत होता. या लीगमध्ये कोची ब्लू टायगर्सकडून खेळताना संजूने 3 सामन्यात 149 धावा केल्या होत्या. यामध्ये 121 धावांची शतकीय खेळीय त्याने एका डावात केली होती.ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.या व्यतिरिक्त दोन सामन्यात त्याला फारशा धावा करता आल्या नव्हत्या.अशाप्रकारे त्याने 3 सामन्यात 149 धावा केल्या होत्या. आता इतक्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

आशिया कपसाठी भारताचा संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेट कीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षीत राणा, रिंकू सिंग

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup आधी मोठा धक्का? भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून संजूचा पत्ता कट? गंभीरच्या हुकमी एक्क्याला संधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल