शुभमन गिलला ओपनिंगला बॅटिंगसाठी पाठवलं तर संजू सॅमसन कितव्या क्रमांकावर खेळणार? गिलसाठी संजूला टीमबाहेर केलं तर विकेट कीपर म्हणून कोणाला संधी मिळणार? या प्रश्नांची उत्तरं कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीरला शोधावी लागणार आहेत. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनाही गिल कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करणार? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हा निर्णय युएईमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण पाहून घेतला जाईल, असं उत्तर दिलं.
advertisement
गिलसाठी सूर्याच्या मित्राचा बळी?
मागच्या काही काळापासून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोन्ही ओपनरनी टीम इंडियाला तडाखेबाज सुरूवात करून दिली आहे, त्यामुळे या दोघांचाही बॅटिंग क्रम बदलण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळू शकते, तर चौथ्या क्रमांकावर टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव खेळेल. पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या, सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंग तर सातव्या क्रमांकावर अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया आशिया कपमध्ये या टॉप-7 सह मैदानात उतरली तर मात्र तिलक वर्माला टीमबाहेर बसावं लागू शकतं. तिलक वर्मा हा सूर्यकुमार यादवसह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तसंच भारताकडून खेळताना तिलक वर्माने चांगली कामगिरीही केली आहे, पण आता गिलची टीम इंडियात एन्ट्री झाल्यामुळे तिलक वर्माला बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू दीपदास गुप्ता यांनी न्यूज18 सोबत बोलतानाही तिलक वर्माला बाहेर बसावं लागू शकतं, अशी शक्यता वर्तवली आहे. याशिवाय मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीऐवजी कुलदीप यादवला सधी मिळेल, असं दीपदास गुप्ता यांना वाटतं.
दीपदास गुप्ताची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग