TRENDING:

Ajit Agarkar : टीम इंडियाच्या सिलेक्शननंतर निवड समितीचं भवितव्यही ठरलं, BCCI ने घेतला अजित आगरकरचा निर्णय!

Last Updated:

टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सोमवारी आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली, यानंतर आता बीसीसीआयने अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबतही निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सोमवारी आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली, यानंतर आता बीसीसीआयने अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबतही निर्णय घेतला आहे. जून 2023 साली अजित आगरकर यांना भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष करण्यात आलं, तेव्हा त्यांना 2 वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला. यानंतर आता आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. अजित आगरकर निवड समिती प्रमुख असताना भारताने टी-20 वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये विजय मिळवला. टीम इंडियाच्या या यशाबद्दल आगरकर यांना बीसीसीआयकडून ही भेट मिळाली आहे.
टीम इंडियाच्या सिलेक्शननंतर निवड समितीचं भवितव्यही ठरलं, BCCI ने घेतला अजित आगरकरचा निर्णय!
टीम इंडियाच्या सिलेक्शननंतर निवड समितीचं भवितव्यही ठरलं, BCCI ने घेतला अजित आगरकरचा निर्णय!
advertisement

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आगरकरचा करार 2025 च्या आयपीएलपूर्वीच वाढवण्यात आला होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, 'त्यांच्या कार्यकाळात भारतीय टीमने अनेक विजय मिळवले. टेस्ट आणि टी-20 टीममध्येही बदल झाले. बीसीसीआयने त्यांचा करार जून 2026 पर्यंत वाढवला होता आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनी ही ऑफर स्वीकारली होती'.

अजित आगरकरचा करार एक वर्षाने वाढवण्यात आल्यामुळे त्यांना आता टी-20 वर्ल्ड कप 2026 साठीही टीमची घोषणा करावी लागेल. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक अजून आलेलं नसलं तरी ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. कार्यकाळ वाढवल्यामुळे अजित आगरकर आणखी एका टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड करतील.

advertisement

एकाचा पत्ता कट

टीम इंडियाच्या सध्याच्या निवड समितीमध्ये आगरकर, एस.एस. दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरथ यांचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर निवड समितीमध्ये काही बदल होतील, असे बोललं जात आहे. सप्टेंबर 2021 मध्ये, शरथ यांनी ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि जानेवारी 2023 मध्ये त्यांना वरिष्ठ निवड समितीत बढती देण्यात आली. पण, आता ते चार वर्षे पूर्ण करतील, त्यामुळे बीसीसीआय त्यांच्या जागी नवीन चेहरा घेऊ शकते.

advertisement

सोमवारीच आशिया कप 2025 साठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय टीम ही स्पर्धा खेळणार आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची फायनल 28 सप्टेंबरला खेळवली जाईल.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ajit Agarkar : टीम इंडियाच्या सिलेक्शननंतर निवड समितीचं भवितव्यही ठरलं, BCCI ने घेतला अजित आगरकरचा निर्णय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल