भारताकडून 24 टेस्ट खेळणाऱ्या प्रग्यान ओझाला बीसीसीआय नवी जबाबदारी देणार आहे. बीसीसीआय पुरुष आणि महिला निवड समितीमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. पुरुष टीमसाठी बीसीसीआय दोन नवीन निवड समिती सदस्य निवडण्याची शक्यता आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार प्रग्यान ओझा साऊथ झोनमधून निवड समिती सदस्य होण्याचा प्रबळ दावेदार आहे.
साऊथ झोनमधून सध्या टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य असलेले श्रीधरन शरत यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यांच्याऐवजी प्रग्यान ओझाची निवड समिती सदस्य म्हणून वर्णी लागू शकते. तर श्रीधरन शरत ज्युनिअर टीमच्या निवड समितीचे प्रमुख होऊ शकतात.
advertisement
प्रग्यान ओझाचं आंतरराष्ट्रीय करिअर
प्रग्यान ओझाने त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच वेस्ट इंडिजविरुद्ध 2013 साली खेळली. या सामन्यात ओझाने 10 विकेट घेतल्या, त्यामुळे भारताचा इनिंग आणि 126 रननी विजय झाला. हा सामना सचि तेंडुलकरच्या करिअरमधला शेवटचा सामना होता. सचिनच्या शेवटच्या टेस्टमध्ये प्रग्यान ओझाने केलेली ही कामगिरी झाकोळली गेली आणि ओझासाठीही हा सामना शेवटचा ठरला. डावखुरा स्पिनर असलेल्या प्रग्यान ओझाने 24 टेस्टमध्ये 113 विकेट घेतल्या, ज्यात त्याने 7 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 19 वनडेमध्ये 21 विकेट आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 विकेटही मिळवल्या.