TRENDING:

रोहित शर्माने निवृत्ती घ्यावी म्हणून आणली Bronco Test? ODI च्या वर्ल्ड कपआधी BCCI च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह!

Last Updated:

Manoj Tiwari On Rohit sharma : ब्रॉन्को टेस्टवर माजी क्रिकेटर मनोज तिवारी याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून गौतम गंभीरवर टीका देखील केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bronco Test Cricket : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने दमदार प्रदर्शन केलं. परंतू इंग्लंड दौऱ्यामध्ये अनेक खेळाडूंना खासकरून फास्ट बॉलरना फिटनेसच्या समस्यांनी ग्रासलं होतं. अशातच आता खास बॉलर्ससाठी बीसीसीआयने ब्रॉन्को टेस्ट सुरू केली आहे. मात्र, आता या ब्रॉन्को टेस्टवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रोहित शर्माने निवृत्ती घ्यावी म्हणून ही टेस्ट आणली गेलीये, असा आरोप करण्यात आला आहे.
Manoj Tiwari On Rohit sharma
Manoj Tiwari On Rohit sharma
advertisement

नेमकं प्रकरण काय?

रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी आणलेल्या यो-यो टेस्टला आता पूर्णविराम लागला असून त्याच्या जागी ब्रॉन्को टेस्ट घेण्यात येणार आहे. अशातच आता ब्रॉन्को टेस्टवर माजी क्रिकेटर मनोज तिवारी याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून गौतम गंभीरवर टीका देखील केली आहे.

काय म्हणाला मनोज तिवारी?

advertisement

2027 च्या वर्ल्ड कप प्लानिंगमधून विराटला बाहेर करणं खूप कठीण जाईल, पण मला शंका आहे की रोहित शर्माला टीममध्ये ठेवलं जाईल. मी भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ब्रॉन्को टेस्ट ही रोहित शर्मासारख्या खेळाडूंसाठी आणली गेली आहे, असा आरोप मनोज तिवारीने केला आहे.

यो-यो टेस्ट बंद

advertisement

गंभीर, सेहवाग, युवराज आणि इतर दिग्गज खेळाडू खूप चांगली कामगिरी करत होते, पण 2011 साली टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर यो-यो टेस्ट आणण्यात आली, आता ब्रॉन्को टेस्ट सुरू करण्यात येणार आहे, असं मनोज तिवारी म्हणाला आहे.

दरम्यान, गौतम गंभीर मागच्या वर्षी जुलै महिन्यात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला. तर आता एड्रियन ले रॉक्स टीम इंडियाचे स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच झाले आहेत. एड्रियन टीममध्ये आल्यानंतर त्यांनी ब्रॉन्को टेस्ट सुरू करण्याचा आग्रह धरला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित शर्माने निवृत्ती घ्यावी म्हणून आणली Bronco Test? ODI च्या वर्ल्ड कपआधी BCCI च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल