आज रणजी हंगाम 2024-25च्या अंतिम सामन्यात विदर्भाने केरळचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव केला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले.गेल्या सात वर्षातील विदर्भाचे हे तिसरे रणजी विजेतेपद ठरले आहे.या ऐतिहासिक विजेतेपदानंतर रणजी संघासाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली. ती म्हणजे संघाला विजेतेपद मिळून देणारा कर्णधार अक्षय वाडकरची निवृत्ती होय.
विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरचा हा शेवटचा सामना होता. संघाने कर्णधाराला अखेरच्या सामन्यात सर्वोत्तम असा निरोप दिला. पण चाहत्यांच्या मनात एक फक्त वयाच्या ३०व्या वर्षी अक्षयने निवृत्ती का घेतली.
advertisement
विजयानंतर हर्ष दुबे काय म्हणाला?
विदर्भाच्या हर्ष दुबेने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात सर्वाधिक ६९ विकेट्स घेत इतिहास रचला.आता तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज बनला आहे.
रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकल्यानंतर हर्ष दुबे यांनी कर्णधार अक्षय वाडकरबद्दल सांगितले की, हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. गेल्या वर्षी आपण अंतिम सामना गमावला होता. अक्षय भाई निवृत्त होत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.
कसा रंगला सामना?
भारतात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामातील अंतिम सामना विदर्भाने जिंकला आणि ७४ वर्षांनंतर केरळला रणजी ट्रॉफीच्या विजेतेपदापासून वंचित ठेवले. विदर्भाकडून दुसऱ्या डावात करुण नायरने १३५ धावा केल्या. त्यामुळे विदर्भाने शेवटच्या दिवशी नऊ विकेटच्या मोबदल्यात ३७५ धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. पण पहिल्या डावात ३७९ धावा करून विदर्भाने विजय मिळवला आणि केरळ (३४२) वर मात केली. आता विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर यासोबत निवृत्त होणार आहे, यावर हर्ष दुबे यांनी मोठे विधान केले आहे.
अक्षय वाडकरची कारकिर्द
विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर हा ३० वर्षांचा आहे आणि हा त्याचा शेवटचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम आहे. अंतिम सामना जिंकून त्याला चॅम्पियन खेळाडूचा किताब मिळाला.
नागपूरचा रहिवासी असलेल्या अक्षयने २०१३ मध्ये विदर्भासाठी स्थानिक क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि २०१७ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने विदर्भासाठी ६१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३८६५ धावा, ४७ लिस्ट ए सामन्यांमध्ये ११०४ धावा आणि २८ टी-२० सामन्यांमध्ये ५७० धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, एकूण ५५३९ धावा करणारा अक्षय आता त्याचा शेवटचा सामना खेळला आहे आणि त्याच्या कारकिर्दीत तो कधीही टीम इंडियाच्या राष्ट्रीय निवडकर्त्यांना प्रभावित करू शकला नाही. तथापि, रणजी करंडक विजेतेपदाने त्याच्या कारकिर्दीला सुवर्ण निरोप दिला आहे.