वर्ल्ड कपचे 4 सामने संकटात
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये या स्पर्धेतील चार सामने आयोजित केले जाणार आहेत, पण क्रिकबझच्या वृत्तानुसार, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) ला या स्टेडियममध्ये सामने आयोजित करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून अद्याप आवश्यक मान्यता मिळालेली नाही. या सामन्यांमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील उद्घाटनाचा सामना तसंच सेमी फायनलच्या सामन्याचा समावेश आहे.
advertisement
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या स्पर्धा आयोजित करण्याबाबत अलीकडेच गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. या वर्षी जूनमध्ये आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या उत्सवादरम्यान स्टेडियमभोवती झालेल्या चेंगराचेंगरीमुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक लोक जखमी झाले. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला महाराजा T20 स्पर्धा बंगळुरूहून म्हैसूरला हलवावी लागली आणि आता महिला वर्ल्ड कपच्या सामन्यांबाबत सस्पेन्स आहे.
वर्ल्ड कपमध्ये कोणत्या टीम?
महिला क्रिकेट वर्ल्ड कप 12 वर्षांनी भारतात परत येत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतच या स्पर्धेचं आयोजन करणार होता, पण पाकिस्तानने भारतात खेळायला नकार दिल्यामुळे श्रीलंकेला संयुक्त यजमानपद दिलं गेलं आहे. महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या टीम सहभागी होणार आहेत.