श्रेयस अय्यर का घेतलं नाही? - मनोज तिवारी
मनोज तिवारीच्या मते, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल हे दोन्ही खेळाडू आशिया कपच्या संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र होते. एकीकडे, शुभमन गिलला टी-20 मध्ये परत आणण्यासाठी उपकर्णधारपद दिलं गेलं, तर दुसरीकडे अय्यरला संघातून पूर्णपणे वगळलं गेलं. या निर्णयामुळे मोठा वाद सुरू झाला आणि गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. माजी राष्ट्रीय मुख्य निवडकर्ते क्रिस श्रीकांत यांच्यासह अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी यशस्वी आणि श्रेयस यांना दुर्लक्षित केल्याबद्दल निवड समितीवर जोरदार टीका केली आहे.
advertisement
निवड समितीची बैठक थेट प्रक्षेपित करा
आपली नाराजी व्यक्त करताना तिवारी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, “जे खेळाडू संधी मिळवण्यासाठी पात्र आहेत, त्यांना संधी मिळत नाहीये. त्यामुळे मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे की, निवड समितीची बैठक थेट प्रक्षेपित केली पाहिजे, जेणेकरून क्रिकेटप्रेमींना हे कळेल की कोणत्या खेळाडूला का निवडले गेले आणि दुसऱ्याला का नाही? फक्त पत्रकार परिषदेत येऊन एखाद्या खेळाडूला वगळण्याबद्दल एक-दोन गोष्टी सांगणे आणि नंतर काही वेगळेच करणं योग्य नाहीये.”
गंभीरवर खोचक टीका
तिवारी पुढे म्हणाले, “दोन योग्य खेळाडू, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जायसवाल, टीममधून बाहेर आहेत. तुम्ही गौतम गंभीर यांच्या जुन्या मुलाखती पाहिल्या, तर त्यांनी म्हटले होते की यशस्वी जयस्वाल असा खेळाडू आहे, ज्याला टी-20 क्रिकेटमधून बाहेर ठेवले जाऊ शकत नाही. आता जेव्हा गंभीर स्वतः कोच आहेत, तेव्हाही यशस्वीसाठी संघात जागा नाहीये.”
दरम्यान, श्रेयस अय्यरला संघात न घेतल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोप उठवली जात असताना आता मनोज तिवारीने देखील आपलं मत मांडलं आहे.