श्रेयस अय्यरची 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड वनडे सीरिजसाठीही भारतीय टीममध्येही निवड झाली आहे. श्रेयस अय्यर फिटनेस टेस्ट पास झाला तरच न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळू शकणार आहे.
श्रेयस अय्यर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी फिट झाला तर 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या नॉक आऊट सामन्यांसाठी मुंबईला वेगळा कर्णधार नियुक्त करावा लागेल. परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, पण श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीच्या उरलेल्या दोन लीग सामन्यांमध्ये टीमचं नेतृत्व करेल, असं एमसीएचे सचिव उन्मेश खानविलकर म्हणाले आहेत.
advertisement
मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कॅच पकडताना श्रेयस अय्यरच्या पोटाला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर सिडनीमधल्याच रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून श्रेयस अय्यर मैदानाबाहेर आहे. मंगळवारी श्रेयस अय्यर पुनरागमन करणार आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई ग्रुप सीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईचे उरलेले सामने मंगळवारी हिमाचलविरुद्ध आणि 8 जानेवारीला पंजाबविरुद्ध होणार आहेत, पण त्यांचं नॉकआऊटला पोहोचणं निश्चित मानलं जात आहे.
यशस्वी जयस्वालला डबल धक्का
विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात शार्दुल ठाकूरने मुंबईचं नेतृत्व केलं, पण आता शार्दुल अनफिट झाला आहे, त्यामुळे यशस्वीला मुंबईचं नेतृत्व करण्याची संधी होती. पण श्रेयस अय्यर टीममध्ये आल्यामुळे जयस्वालची कॅप्टन्सीची संधी हुकली. दुसरीकडे श्रेयस अय्यर फिटनेस टेस्ट पास झाला तर तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरेल. श्रेयस अय्यर फिट झाला नसता तर कर्णधार शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर आणि जयस्वाल रोहित शर्मासोबत ओपनिंगला खेळण्याची शक्यता होती.
