TRENDING:

Dream11 ने सोडली टीम इंडियाची साथ, कोण होणार पुढचा स्पॉन्सर? रेसमध्ये टॉप कंपन्या!

Last Updated:

भारत सरकारने ऑनलाईन फॅन्टसी गेमिंग ऍपवर पैसे लावून खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे टीम इंडियासमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारत सरकारने ऑनलाईन फॅन्टसी गेमिंग ऍपवर पैसे लावून खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे टीम इंडियासमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. Dream11 ने टीम इंडियाच्या स्पॉन्सरशीपमधून माघार घेतली आहे. आशिया कप 2025 सुरू व्हायला काही दिवसच शिल्लक आहेत, त्यामुळे आता बीसीसीआयला टीम इंडियासाठी नवा स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. तसंच आशिया कपसाठी बीसीसीआयला टीम इंडियाची जर्सीही पुन्हा प्रिंट करावी लागणार आहे.
Dream11 ने सोडली टीम इंडियाची साथ, कोण होणार पुढचा स्पॉन्सर? रेसमध्ये टॉप कंपन्या!
Dream11 ने सोडली टीम इंडियाची साथ, कोण होणार पुढचा स्पॉन्सर? रेसमध्ये टॉप कंपन्या!
advertisement

टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सरशीपसाठी काही टॉप कंपन्यांची नावंही समोर आली आहेत. यात Zerodha, Angel One, आणि Groww यांच्यासारख्या फिनटेक कंपन्यांचा समावेश आहे. ऑटोमोबाईल आणि FMCG क्षेत्र भारतातल्या व्यवसायामधील सगळ्यात प्रमुख क्षेत्रांपैकी आहे. या कंपन्यांनी अनेक क्रिकेट इव्हेंट्सनाही स्पॉन्सर केलं होतं. टाटा ग्रुप सध्या आयपीएलचं प्रमुख आयोजक आहे. याशिवाय Reliance आणि Adani Group यांच्याकडेही टीम इंडियाचं स्पॉन्सर व्हायची संधी आहे.

advertisement

Reliance आणि Adani Group यांनी आधीपासूनच आयपीएल आणि महिला प्रीमियर लीग (WPL)मध्ये गुंतवणूक केली आहे, त्यामुळे या दोन्ही ग्रुपना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटसोबत गुंतवणूक करण्याची संधी आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Dream11 ने सोडली टीम इंडियाची साथ, कोण होणार पुढचा स्पॉन्सर? रेसमध्ये टॉप कंपन्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल