भारतीय संघाचा मुख्य स्पॉन्सर
ड्रीम 11 ही कंपनी भारतीय संघाचा मुख्य स्पॉन्सर म्हणून करार पुढे चालू ठेवण्यास इच्छुक नाही, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यामुळे, आगामी आशिया कप स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर ड्रीम 11 चा लोगो दिसणार नाही, अशी शक्यता आहे.
देवजीत सैकिया म्हणाले...
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही देशाच्या कायद्यांचा पूर्णपणे आदर करतो आणि सरकारचे सर्व नियम पाळण्यास आम्ही कटिबद्ध आहोत," असे त्यांनी म्हटले आहे. 2023 मध्ये झालेला हा करार प्रत्येक घरच्या सामन्यासाठी 3 कोटी आणि परदेशी सामन्यासाठी 1 कोटी रुपयांचा होता. परंतु, नवीन कायद्यांमुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
नवीन जर्सी स्पॉन्सर
या अनपेक्षित घडामोडींमुळे बीसीसीआयला आता नवीन जर्सी स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. जर आशिया कप सुरू होण्यापूर्वी नवीन स्पॉन्सर मिळाला नाही, तर टीम इंडियाला एका मोठ्या स्पर्धेत लोगोशिवायच खेळावे लागू शकते. हा बीसीसीआयसाठी केवळ आर्थिकच नव्हे, तर ब्रँडिंगच्या दृष्टीनेही एक मोठा प्रश्न आहे.