Bronco Test आहे तरी काय?
ब्रोंको टेस्टमध्ये खेळाडूंना २० मीटर, ४० मीटर आणि ६० मीटरचे अंतर धावून पार करावे लागते. हा एक पूर्ण सेट मानला जातो. खेळाडूंना कोणताही ब्रेक न घेता ६ मिनिटांत सुमारे १२०० मीटरचे अंतर धावत पाच सेट पूर्ण करायचे आहेत. या नवीन टेस्टमुळे खेळाडूंचा फिटनेस आणि कंडीशनिंगचा स्तर अधिक चांगला होईल, अशी अपेक्षा आहे. निवड समितीसाठी ही टेस्ट खेळाडूंच्या निवडीचा एक महत्त्वाचा निकष असेल.
advertisement
गोलंदाजांसाठी महत्त्वाची ठरणार ब्रोंको टेस्ट?
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या वार्षिक करारात असलेल्या अनेक खेळाडूंनी या टेस्टसाठी बंगळूरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला भेट दिली आहे. या टेस्टचा मुख्य उद्देश वेगवान गोलंदाजांवर जिममध्ये जास्त मेहनत घेण्याऐवजी त्यांच्या धावण्यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे. यावर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? असा सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय.
४० मीटरनंतर १० सेकंदाचा ब्रेक
भारतीय टीममध्ये सध्या यो-यो टेस्ट आणि २-किमी टाइम ट्रायल घेतली जाते. यो-यो टेस्टमध्ये खेळाडूंना २० मीटरच्या अंतरावर धावणे असते आणि प्रत्येक ४० मीटरनंतर १० सेकंदाचा ब्रेक मिळतो. यात पास होण्यासाठी १७.१ हा किमान स्कोर निर्धारित करण्यात आला आहे. २-किमी टाइम ट्रायलमध्ये वेगवान गोलंदाजांना ८ मिनिटे १५ सेकंद आणि फलंदाज व विकेटकीपरना ८ मिनिटे ३० सेकंदाचा वेळ दिला जातो.
ब्रोंको टेस्ट अधिक वेगवान
दरम्यान, या दोन्ही टेस्ट्सच्या तुलनेत ब्रोंको टेस्ट अधिक वेगवान आहे आणि कमी वेळेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीची चांगली परीक्षा घेते. एड्रियन ले रूक्स दुसऱ्यांदा भारतीय संघासोबत जोडले गेले आहेत. यापूर्वी २००२ ते २००३ या काळात ते संघासोबत होते.