हरमनप्रीत कौरने रचला इतिहास
हरमनप्रीत कौर ही वूमेन्स टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या चार स्पर्धेत राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय कर्णधार ठरली आहे. यापूर्वी, मिताली राजने तीन स्पर्धांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं, तर झुलन गोस्वामीने पहिल्या दोन वर्ल्ड कपमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केलं होतं. हरमनप्रीत कौरने 2018, 2020, 2023 आणि 2024 या चार वर्षात टीम इंडियासाठी वर्ल्ड कपची जबाबदारी सांभाळली आहे.
advertisement
सामन्यापूर्वी या स्पर्धेत भारताचा तिसरा क्रमांकाचा फलंदाजीला कोण येईल? याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना देखील याविषयी स्पष्टपणे सांगता आलं नव्हतं. अशातच आता हरमनप्रीत कौर स्वत: याची जबाबदारी घेईल, अशी शक्यता वर्तविली जातीये.
इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.
न्यूझीलंड वूमन्स प्लेईंग ईलेव्हन : न्यूझीलंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू आणि ईडन कार्सन.