बस ड्रायव्हरने दिला सल्ला
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान सध्या चर्चेत आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम बस ड्रायव्हरने त्याला कोहलीला कसं आऊट करता येईल याचा सल्लाही दिला होता, असं हेमांशू सांगवान याने म्हटलं आहे. आम्ही टीमच्या बसमधून प्रवास करत असताना बस ड्राईव्हरनने मला सल्ला दिला होता. विराटला चौथ्या-पाचव्या स्टंपच्या लाईनवर बॉलिंग कर म्हणजे तुला त्याची विकेट मिळेल, असं बस ड्राईव्हरन म्हटलं होतं, असं हेमांशूने सांगितलं.
advertisement
विराटसाठी विशेष रणनिती नव्हती
मी माझ्या ताकदीनुसार गोलंदाजी केली आणि विकेट घेतल्या. विराट कोहलीसाठी कोणतीही विशेष रणनिती तयार केली नव्हती. दिल्लीच्या खेळाडूंना आक्रमक क्रिकेट खेळायला आवडते आणि आम्ही त्यावरच काम केलं, असं हेमांशू सांगवान याने म्हटलं आहे. त्यावेळी त्याने विराटचं कौतूक देखील केलं. विराट कोहली मोठा खेळाडू आहे. त्याची विकेट मिळवणं माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे, असं हेमांशू सांगवान याने म्हटलं आहे.
कोहली मोठ्या मनाचा
सामना संपल्यानंतर विराट कोहलीने रेल्वेच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन हिमांशू सांगवानची भेट घेतली अन् त्याचं कौतूक केलं. ज्या बॉलने विकेट घेतली, त्या बॉलवर ऑटोग्राफ देखील केली. हा तोच चेंडू आहे का ज्याने तू मला बाद केलेस? असा सवाल विराटने विचारला. खुप चांगला बॉल होता, मला आवडलं, असं विराट म्हणाला. मी तुझ्याबद्दल ऐकले आहे. तू चांगला गोलंदाज आहेस, असं म्हणत विराटने त्याला शुभेच्छा देखील दिल्या.
दिल्लीचा मोठा विजय
दरम्यान, रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघाने रेल्वे संघाचा पराभव केला आहे. दिल्लीने महत्त्वाच्या सामन्यात रेल्वे रणजी संघाचा एक डाव आणि 19 धावांनी पराभव केला. आयुष बदोनीच्या कॅप्टन्सीखाली दिल्लीने विजय मिळवलाय. दुसऱ्या डावात रेल्वेचे फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. शिवम शर्माने 33 डावात 5 विकेट्स काढल्या. त्यामुळे दिल्लीचा विजय आणखी सोपा झाला.